गोवा : गोव्यात संपन्न झालेल्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अत्यंत प्रतिष्ठेचं 'युनेस्को गांधी मेडल' 'क्षितीज द होरायझन'चे दिग्दर्शक मनोज कदम यांना मिळालंय.
मराठी सिने सृष्टीसाठी हे पहिल्यांदाज मिळाल्याने मराठीसाठी हे अभिमानाची बाब आहे. ऊस तोडकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडण्याऱ्या मुलीची संघर्षाची कहाणी आहे.
या निमित्ताने शेतकऱ्यांच्या समस्था जागतिक पातळीवर पोहचवण्यासाठी मदत झालीय. 'इफ्फी'त या चित्रपटाला रसिकांनी विशेष दाद दिली. या चित्रपटाला अनेक महोत्सवात गौरविण्यात आलं.
या सिनेमात मुख्य भूमिकेत वैष्णवी तांगडे असून इंडियन पॅनोरमात तिचा हा दुसरा चित्रपट आहे.