सीडीआर प्रकरणी अभिनेत्री उदिता गोस्वामीची पोलीस चौकशी

उदिता गोस्वामी यांचा विवाह मोहित सुरी यांच्याशी झालाय. विवाहानंतर पहिल्याच वर्षी त्यांच्या आयुष्यात संशयाचं वादळ घोंगावू लागलं. 

Updated: Apr 26, 2018, 06:17 AM IST
सीडीआर प्रकरणी अभिनेत्री उदिता गोस्वामीची पोलीस चौकशी  title=

मुंबई : बेकायदेशीर सीडीआर अर्थात कॉल तपशील प्रकरणी ख्यातनाम सिने अभिनेत्री उदिता गोस्वामी यांची बुधवारी ठाणे पोलिसांनी चौकशी केली. तिच्या जबाबात अॅड. रिझवान सिद्दीकी यांचं नाव समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. कुणाच्याही मोबाईल क्रमांकाचे तपशील बेकायदेशीरपणं मिळवून त्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं जानेवारी 2018 मध्ये केला. याच प्रकरणामध्ये अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचीही चौकशी झाली.

उदिता गोस्वामी यांचा विवाह मोहित सुरी यांच्याशी झालाय. विवाहानंतर पहिल्याच वर्षी त्यांच्या आयुष्यात संशयाचं वादळ घोंगावू लागलं. उदिता यांना पतीवर संशय असल्यानं त्या अॅड. रिझवान सिद्दीकी यांना भेटल्या. 

अॅड. सिद्दीकी यांनी त्यांना मोहन सुरी यांच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढून दिला होता. उदिता गोस्वामी यांनी ही माहिती लेखी जबाबाद्वारे ठाणे पोलिसांना दिली. 

अशाच एका प्रकरणात याआधी अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी आयेशा श्रॉफ यांचाही जबाब नोंदवण्यात आलाय.