युझरने अभिषेकला विचारला अगदी खाजगी प्रश्न

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत पाहायला मिळतात. तसेच 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 6, 2017, 03:53 PM IST
युझरने अभिषेकला विचारला अगदी खाजगी प्रश्न title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन अनेकदा आपल्या फॅमिलीसोबत पाहायला मिळतात. तसेच 

अनेकदा आपल्या फॅमिलीला घेऊन प्रोटेक्टिव्ह असतात. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय बच्चन देखील एका कार्यक्रमात गेली असता फोटोग्राफरने फोटो काढण्यासाठी खूप चुकीच्या पद्धतीचा वापर केला म्हणून अभिषेक 
बच्चन भडकला. अशाच पद्धतीने ट्विटरवर एका युझरने अभिषेक बच्चनला आराध्य शाळेत जात नाही का? असा सवाल विचारला. 

Abhishek Bachchan, Twitter

झालं असं की, एका युझरने ट्विट करताना विचारलं की, तुमची मुलगी शाळेत जाते की नाही? मला प्रश्न पडला आहे की अशी कोणती शाळा आहे जी मुलाला पिकनिकला जाण्यासाठी कायम परमिशन देतात. की तुम्ही तुमच्या मुलीला ब्युटी विदआऊट ब्रेन करत आहात. ती कायम आपल्या घमेंडी आईसोबत हातात हात घालून फिरताना दिसते. तिचं वागणं सामान्य मुलांसारख नाही. या ट्विटवर अभिषेक बच्चन शांत राहिले नाहीत. 

यावर अभिषेकने रिप्लाय दिला की, मॅम जिथपर्यंत मला माहित आहे की, जास्त करून शाळा या विकेंडला बंद असतात. आणि ती विकेंड डेजमध्ये शाळेत जाते. तुमच्या ट्विटमध्ये तुम्ही जे स्पेलिंग मिस्टेक केलं आहे त्याकरता तुम्हाला देखील शाळेत जाण्याची नितांत गरज आहे. युझरने अभिषेकच्या रिप्लायचं वाईट न वाटता अगदी छानपैकी धन्यवाद केलं.