मुंबई : आजकाल सेलिब्रिटी त्यांच्या फॅन्ससोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. मात्र नुकताच अमिताभ बच्चन आणि ट्विटरमध्ये रंगलेला वाद पुन्हा समोर आला आहे.
अमिताभ बच्चन यांचे फॅन्स काही दिवसांपूर्वी अचानक कमी करण्यात आल्याने त्यांनी 'ट्विटर' ला रामराम ठोकण्याचा इशारा दिला होता.
अमिताभ बच्चन यांनी केलेल्या नव्या ट्विटमध्ये ट्विटरला खास संदेश आणि कविता लिहली आहे. अचानक 200,000 फॉलोवर्स एका दिवसामध्ये हटवण्यात आल्याने बीग बींनी आता हे ट्विट हटवू नका असा खास मेसेज दिला आहे.
T 2623 - अरे Twitter भाई साहेब , या बहनजी ( पता नहीं ना इनका gender क्या है , इस लिए दोनों को संभोधित किया ), हम कुछ छाप रहे हैं , और आप उसको छपने ही नहीं दे रहे हैं ! अमाँ , 200,000 follower एक ही दिन में काट दिया आपने .. अब इसे तो मत काटो यार !! अब इतना भी ज़ुल्म न करो pic.twitter.com/D1F4xYiUyq
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 22, 2018
T 2623 - Mr/Ms Twitter dedicated to you :
चिड़िया ओ चिया कहाँ है तेरा घर ?
उड़ उड़ आती हो यहाँ पे फ़ुर्र फ़ुर्र ,
दर्शनर्थी इतने तेरे , क्या है तेरा डर ,
रूठोगी तो बोलो हम फिर जाएँगे किस दर ।
आशीर्वाद सदा तुम्हारा बना रहे हमपर
बस, नित्य नवेली पुष्प हमारे, बरसेंगे तुमपर !! pic.twitter.com/UuCmon8ky8— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 22, 2018
बीग बींनी काही दिवसांपूर्वी 40 लाख फॉलोवर्स कमी केल्याने त्याचा निषेध नोंदवला होता.
न्यूयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार, ट्विटरने देवूमी सारख्या कंपन्या ट्विटरच्या काही नियमांचे उल्लंघन करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी नियम कडक केल्याचे ट्विटरने ही भूमिका घेतली आहे. मात्र बीग बींचे फॉलोवर्स कमी करण्यामागे हेच कारण आहे का ? याबाबत मात्र अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही.