राम रहीम विरोधात ट्विट केल्यामुळे ट्विंकल खन्नाला धमकी

राम रहीम संदर्भात अनेक सेलेब्सने ट्विट केले. काहींना राम रहीम दोषी असण्यावर ट्विट केलं तक काहींनी निकालाच्या विरोधात ट्विट केलं आहे. यामध्ये राम रहीमबाबत आपले स्पष्ट विचार मांडणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील होती. मात्र आता या तिला तिच्या या वक्तव्यांवर धमकी मिळू लागली आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 31, 2017, 06:44 PM IST
राम रहीम विरोधात ट्विट केल्यामुळे ट्विंकल खन्नाला धमकी  title=

नवी दिल्ली : राम रहीम संदर्भात अनेक सेलेब्सने ट्विट केले. काहींना राम रहीम दोषी असण्यावर ट्विट केलं तक काहींनी निकालाच्या विरोधात ट्विट केलं आहे. यामध्ये राम रहीमबाबत आपले स्पष्ट विचार मांडणारी अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील होती. मात्र आता या तिला तिच्या या वक्तव्यांवर धमकी मिळू लागली आहे. 

आपल्या साऱ्यांना माहितंच आहे की ट्विंकल खन्ना आपल्या बेधडक बोलण्यामुळे अतिशय लोकप्रिय आहे. राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर तिने ट्विट केलं होतं. त्याचप्रमाणे त्यानंतर तिने ब्लॉग देखील लिहिला होता. ज्यावर आता दिला धमकी मिळत असल्याचं तिने सांगितलं आहे. टाइम्स ऑफ इंडियासाठी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये ट्विंकलने सांगितलं की, राम रहीम विरोधात ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावरही तिला टोकणं सुरू होतंच. तसेच राम रहीमचे जे भक्त मोठ्या पदावर आहेत त्यांनी ट्विंकलच्या आईकडे म्हणजे अभिनेत्री डिंपल कपाडियाला फोन करून धमकी देण्यास सुरूवात देखील केली होती. 

धमकीत असं सांगण्यात येत असे की, जर ट्विंकलने बाबा विरोधात बोलणं बंद केलं नाही तर तिला याचे परिणाम भोगावे लागतील. या अगोदर देखील ट्विंकलने जानेवारी महिन्यात देखील राम रहीम विरोधात ट्विट केलं होतं. आणि तेव्हा देखील तिला धमकीचे फोन आले होते.