ट्विंकल खन्नाची बहिण असायची कॅमेऱ्यापासून दूर, पहिल्यांदाच फोटो आला समोर

ट्विंकलची बहिण बॉलिवूडपासून दूर 

Updated: Mar 15, 2021, 08:43 AM IST
ट्विंकल खन्नाची बहिण असायची कॅमेऱ्यापासून दूर, पहिल्यांदाच फोटो आला समोर title=

मुंबई : ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna)  जरी आता सिनेमांपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर कायम काही ना काही पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा ट्विंकल खन्ना चर्चेत आली आहे. त्याला कारणही अगदी तसंच खास आहे. ट्विंकल खन्नाने इंस्टाग्रामवर (Twinkle Khanna shared Sister Rinke Khanna Pic on Social Media) एक खास पोस्ट केली आहे. ज्या पोस्टवरून सध्या ती आणि एक व्यक्ती चर्चेत आली आहे. 

ट्विंकल खन्नाने शेअर केली खास फोटो 

ट्विंकल खन्नाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बहिणी रिंकी खन्नाचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोन्ही बहिणी अतिशय सुंदर दिसत आहे. फोटो शेअर करत तिने अतिशय सुंदर कॅप्शन देखील लिहिलं आहे. 'या सुट्टीचा सर्वात सुंदर भाग. दीड वर्षांनंतर मी माझ्या बहिणीला भेटले. अनेक काळापासून आम्ही एकमेकांपासून लांब होतो.'

काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत मालदीवमध्ये सुट्टया घालवायला गेले होते. तेथून ट्विंकलने अतिशय सुंदर फोटो शेअर केलेत. आता ट्विंकल मुंबईत परतली आहे. मात्र ती आपल्या सुट्ट्यांच्या दिवसांची आठवण काढत आहे. 

फोटो शेअर करताना ट्विंकल खन्नाने 'खन्ना सिस्टर' असा हॅशटॅग टाकला आहे. ज्यावर खूप प्रतिक्रिया येत आहेत. 

या अगोदर अक्षय कुमारने ट्विंटकल खन्नासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केला होता. अक्षयने लिहिलं होतं की,'सुंदर जागा, आनंदी चेहरे... आम्ही खूप नशिबवान आहोत की, कोरोना सारख्या महामारीच्या काळात सुट्टीवर जाण्याची संधी मिळाली.' अक्षय आणि ट्विंकल 17 जानेवारी 2001 रोजी लग्नबंधनात अडकले. अक्षय-ट्विंकलला दोन मुलं असून मुलगा आरव 18 वर्षांचा आहे तर मुलगी नितारा आठ वर्षांची आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

एवढे वर्ष का होती रिंकी खन्ना दूर?

रिंकी खन्ना ही ट्विंकलची लहान बहिण आहे. 27 जुलै 1977 रोजी तिचा जन्म झाला. 1999 साली 'प्यार मैं कभी कभी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रिंकी खन्नाने स्क्रिनकरता आपलं नाव बदलून रिंकल खन्ना असं केलं. त्यानंतर तिने 'मुझे कुछ केहना है' सिनेमात सपोर्टिंग भूमिका साकारली आहे. त्यानंतर तिने 2001 मध्ये तमिळ सिनेमात डेब्यू केला. 8 फेब्रुवारी 2003मध्ये तिने युके स्थित असलेल्या समिर सरन या व्यावसायिकाशी लग्न केलं. आता ती आणि तिचं संपूर्ण कुटुंब तिथेच स्थायिक आहे