मुंबई : अक्षय कुमार आणि रजनीकांत यांचा '2.0' हा आगामी चित्रपट आहे.
यामध्ये वापरण्यात आलेल्या टेक्नोलॉजीमुळे हा चर्चेत आहे. सोबत हा आतापर्यंतचा सरवात बिग बजेट चित्रपट ठरणार आहे. सुमारे ४५० करोड या चित्रपटावर खर्च करण्यात आले आहेत.
'2.0' या चित्रपटापेक्षा महागडा प्रोजेक्ट 'पोरस' सोनीटीव्हीवर सुरू होणार आहे. या मालिकेवर सुमारे 500 कोटींचा खर्च होणार आहे. मालिकांच्या विश्वांप्रमाणेच चित्रपटांचेही बजेट५०० कोटी इतके नाही.
गुजरात मधील उबर गावात या मालिकेचे सेट्स उभारण्यात आले आहेत. ९ एकर भागावर ११ विविध सेट्स उभे करण्यात आले आहेत. अमित सिंह आणि वैभव यादव यांनी या मालिकेचे सेट्स डिझाईन केले आहेत.
पोरस या मालिकेचे शुटिंग थायलंड, बॅंकॉंकमध्ये होणार आहेत. चित्रपटातील फाईट सिक्वेंससाठी थाय बेस्ड अॅक्शन डिरेक्टरदेखील नेमला आहे.
'पोरस' हा पुरू राजा होता. त्याचे आयुष्य या मालिकेतून दाखवण्यात येणार आहे. लक्ष लालवानी, रति पांडे, मोहित अबरोल, रोहित पुरोहित आणि सुहानी धानकी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. स्वस्तिक प्रोडक्शन सोबत सिद्धार्थ कुमार तिवारी ही मालिका बनवत आहेत.