लग्नाच्या चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट

लग्न ही सोप्पी गोष्ट नाही

Updated: Mar 12, 2020, 01:01 PM IST
लग्नाच्या चार वर्षांनंतर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट  title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीचा घटस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिद्धांत कार्निक आणि मेघा गुप्ता या लोकप्रिय जोडीने घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. दोघांनी गेल्यावर्षी मार्च महिन्यात वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 

सिद्धांत कार्निक आणि मेघा गुप्ता यांच 2016 मध्ये लग्न झालं आहे. एका मुलाखतीत आपल्या नात्याबद्दल सिद्धांत अतिशय मोकळेपणाने बोलला आहे. 'लग्न ही सोप्पी गोष्ट नाही. आमच्या नात्यात आम्ही संयम गमावला होता. प्रत्येक नात्यात मानसिक शांतता असणं फार गरजेचं असते. नात्यात असताना मला या मनःशांतीची फार आठवण यायची.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Siddharth from #ladiessangeet . . a cineplay coming soon on #zeetheatre @zeetheatre .. . @nareshpurva.. writer / director . .  @amitakmw

A post shared by Siddhant Karnick (@siddhantkarnick) on

पुढे तो म्हणाला की,'मेघा आणि मी थेरेपी देखील घेत होतो. जेणेकरून सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. मग आम्ही गेल्यावर्षी मार्चपासून वेगळं राहण्याचं ठरवलं. वेगळं राहिल्यावर आम्हाला जाणवलं की, आम्ही जास्त शांत झालो. मी असं म्हणतं नाही की, आम्ही एकत्र चांगले नव्हतो. तिच्यासोबत माझ्या चांगल्या आठवणी आहेत. घटस्फोट वाईट असू शकतो, पण नशिबाने आमच्यासाठी ही वाईट गोष्ट नाही. मी आणि माझी पत्नी मेघा तेव्हा वेगळे झालो जेव्हा आमच्यात थोडं प्रेम होतं. यानेच आम्हाला वेगळं होण्यासाठी मदत केली.'

सिद्धांतने सांगितलं की,'त्यांच्या या निर्णयाला दोन्ही कुटुंबियांनी देखील समजून घेतलं. लग्न फक्त दोन व्यक्तींमध्ये नाही तर दोन कुटुंबांमध्ये होतं. मी आता सध्या स्वतःसोबत वेळ घालवत आहे आणि आनंदात आहे. जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करणं कमी करतो. तेव्हा आपला विचार हा दोघांबद्दलचा असतो. स्वतःला विसरणं हे चांगल नाही. आपल्याजवळ स्वतःच वेगळं स्थान आणि ओळख असण गरजेचं आहे.'

सिद्धांत आणि मेघा 2015 मध्ये एका मित्राच्या पार्टीत भेटले. या पार्टीतूनच त्यांची ओळख वाढत गेली. मैत्री झाली आणि त्यांनी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.