डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या

डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 10, 2018, 09:53 PM IST
डिप्रेशनमध्ये टीव्ही अभिनेत्रीने केली आत्महत्या title=

कोलकाता : डिप्रेशनमध्ये आतापर्यंत अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्या आहेत. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.

दक्षिण कोलकातामधील रिजेंट पार्कमधील युवा अभिनेत्री मौमिता साहा हिचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला. मौमिता बऱ्याच काळापासून डिप्रेशनमध्ये होती. शेजारच्या व्यक्तींनी पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 23 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह आढळला. या फ्लॅटमध्ये मौमिता दोन महिन्याआधीच राहायला आली होती.

पोलिसांना तिच्या फ्लॅटमध्ये एक सुसाईट नोट देखील मिळाली आहे. ती त्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. हुगळी जिल्ह्याची राहणारी मौमितासोबत जेव्हा आई-वडिलांचा संपर्क झाला नाही तेव्हा त्यांनी घर मालकाला फोन केला. यानंतर त्यांना या घटनेची माहिती झाली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट अजून समोर आलेला नाही.