लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू

काय आहे मृत्यूमागे रहस्य?

Updated: Dec 25, 2019, 08:45 AM IST
लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू  title=

मुंबई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलेब्रिटी शेफ जगी जॉन स्वयंपाक घरात मृत अवस्थेत आढळली आहे. त्यामुळे कलाविश्वात एकच खळबळ माजली आहे. तिच्या मृत्यूचं गुढ अद्यापही स्पष्ट झालेले नाही. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा तिची आई घरात उपस्थित होती. त्यामुळे हा मृत्यू नक्की कसा झाला यावर तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. 

केरळच्या कुरवनकोनम येथे ती आईसोबत एका फ्लॅटमध्ये राहत होती. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, तिच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारचे निशान नाहीत. मुलीच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या आईला मोठा धक्का बसला आहे.

तिची आई घडल्याप्रकरणी कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्याच्या स्थितीत नाही. ती स्वयंपाक घरात काम करत होती एवढचं सांगितल्यानंतर तिच्या आईला भोवळ आल्याचे समजत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिचा मृतदेह सर्वप्रथम शेजारच्यांनी पाहिला. जगीच्या एका मैत्रीणीने शेजारच्यांना फोन करून सांगितले की, बराचवेळ जगी फोन चलत नाही. जेव्हा शेजारच्यांनी तिचा मृतदेह पाहिला तेव्हा तात्काळ या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आता तिच्या मृत्यूमागे नक्की कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

जगी जॉन सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. मृत्यूच्या आधी तिचा ख्रिसमस साजरा करताना एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर चांगलाचं व्हायरल झाला. जगी जॉन गायक, मॉडेल, सेलेब्रिटी परिक्षक त्याचप्रमाणे मोटिव्हेशनल स्पीकर देखील आहे.