Tunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा

Tunisha Sharma : 'अलिबाबा: दास्तान ए काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शनिवारी आपलं जीवन संपवलं. अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरच टोकाचं पाऊल उचललं.

Updated: Dec 26, 2022, 02:00 PM IST
Tunisha Sharma Death Case: "एकत्र राहायचे नव्हते तर मग इतक्या..."; तुनिषाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांचा मोठा खुलासा title=

Tunisha Sharma Death : टीव्ही कलाकार आणि अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma Suicide ) शनिवारी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. मेकअप रुममध्येच तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तुनिषाचा प्रियकर शिझान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता तुनिषाच्या कुटुंबियांनी अनेक खुलासे केले आहेत.

तुनिषा दिवसाआड शिझानच्या घरी जायची

"लडाखला गेल्यावर त्यांची जवळीक वाढली होती. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते आणि त्यामुळे तासनतास बोलायचे. तुनिशा दिवसाआड शिझानच्या घरी जायची. शिझानच्या कुटुंबातील सदस्य, आई आणि बहीण तिच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी नेहमी बनवायचेय. 15 दिवसांपूर्वी तुनिशाला शिझानच्या आयुष्यात आणखी कोणीतरी असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर तुनिशा तुटली. 16 डिसेंबर रोजी सेटवर शूटिंग करत असताना तुनिशाची तब्येत बिघडली. त्यानंतर सेटवरील लोकांनी तिला बोरिवली येथील रुग्णालयात नेले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर आम्हाला याची माहिती देण्यात आहे. जेव्हा आम्ही तिथे पोहोचले तेव्हा तुनिशा 'त्याने माझी फसवणूक केली, तो माझ्याशी असे कसे करू शकतो, त्याने माझ्यावर अन्याय केला,' असे म्हणत होती," असे तिच्या कुटुंबियांनी सांगितले.

त्यानंतर तुनिषाच्या आईने तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तू असे काही करु नको. जर तुम्हाला एकत्र राहायचे नव्हते तर मग ते इतक्या जवळ का आलात, असे तुनिशाच्या आईने तिला सांगितले.

शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाचा खुलासा

रविवारी पहाटे तुनिषाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पाच डॉक्टर्सच्या पॅनेलकडून शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर तिच्या मृत्यूचे खरं कारण आले आहे. तुनिषाच्या डॉक्टरांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. तुनिषाचा श्वास कोंडल्यानेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. फास लागल्यानेच तुनिषाचा मृत्यू झाल्याचं असंही शवविच्छेदानतून समोर आलय. यावेळी तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

तुनिषा गर्भवती होती?

तुनिषाच्या मृत्यूनंतर अनेक खोटे वृत्त प्रसिद्ध होत असल्याचेही समोर आले आहे. तुनिषा गर्भवती होती आणि तिच्या प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचं म्हटले जात आहे. पोलिसांनी आणि तुनिषाच्या कुटुंबियांनी याबाबत आता महत्त्वाची माहिती दिली आहे. तुनिषा गर्भवती नसल्याचा खुलासा तिच्या कुटुंबियांनी केला आहे.