Tumbbad Re-release Box Office Collection : सोहम शाहचा पुन्हा प्रदर्शित झालेला 'तुंबाड' या चित्रपट पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत. शुक्रवारी बॉलिवूड करीना कपूरच्या 'द बकिंघम मर्डर्स' सोबत 2018 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, बॉक्स ऑफिसवर पाच दिवसात या चित्रपटानं 10.50 कोटींची कमाई केली. तर 'द बकिंघम मर्डर्स' नं फक्त 6.80 कोटींची कमाई केली. इतकंच नाही तर करीनाच्या या क्राइम-थ्रिलरनं सोमवारी आणि मंगळवारी लाखोंची कमाई केली. तर सहा वर्ष जुन्या 'तुंबाड' या चित्रपटानं OTT वर हा चित्रपट आता असूनही चित्रपटगृहात कोटींचं कलेक्शन केलं आहे.
राही अनिल बर्वे यांनी दिग्दर्शित केलेल्या या हॉरर-थ्रिलर 'तुंबाड'नं 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 13.50 कोटींचं लाइफटाइम कलेक्शन केलं आहे. री-रिलीज झाल्यानं वीकेंडला तर चित्रपटानं चांगली कामगिरी केली, आता विकडेला देखील खूप चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे नुकतीच प्रदर्शित झालेल्या 'द बकिंघम मर्डस'मध्ये करीनाच्या कामाची स्तुती होत आहे. पण कमाईच्या बाबतीत 'तुंबाड' नं या चित्रपटाला मागे टाकलं आहे. तर करीनाचा चित्रपट हा चित्रपट तिच्या करिअरच्या 24 वर्षांमधला सगळ्यात कमी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, मंगळवारी री-रिलीज झाल्याच्या 5 व्या दिवशी 'तुंबाड'नं देशात 1.50 कोटींचं कलेक्शन केलं आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे शुक्रवारी ओपनिंग डेला या चित्रपटानं 1.60 कोटी कमवले होते. आता 5 दिवसांनंतर चित्रपटानं एकूण 10.50 कोटींपर्यंत झाला. सगळ्यात महत्त्वाचं हे की पहिल्या आठवड्यातच या चित्रपटानं लाइफटाईमचा टप्पा देखील पार केला. दुसरीकडे 40 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'द बकिंघम मर्डर्स' चं अवस्था फार वाईट आहे. 5 व्या दिवशी मंगळवारी या चित्रपटानं 75 लाख रुपये कमावले. सोमवारी या चित्रपटानं 80 लाख रुपयांची कमाई केली. पाच दिवसात चित्रपटाचं एकूण कलेक्शन फक्त 6.80 कोटींचं कलेक्शन केलं आणि हा चित्रपट फ्लॉप ठरला आहे.
हेही वाचा : 'मी आई होऊ शकत नाही हे मान्य करणं खूप कठीण...'; शबाना आझमी यांचा खुलासा
'द बकिंघम मर्डर्स' ला हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर करीना कपूरनं या चित्रपटातून एक निर्माता म्हणून पदार्पण केलं आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली. तर या चित्रपटाच्या तुलनेत करीनाच्या डेब्यू फिल्मनं म्हणजेच 'रेफ्युजी'नं पहिल्या दिवशी 1.52 कोटींपेक्षा कमी केली आहे. जेपी दत्ताच्या दिग्दर्शनात झालेल्या या चित्रपटानं लाइफटाइम 17.01 कोटींचे कलेक्शन केलं होतं.