आईशप्पथ! विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा पाहून तुम्हाला धक्काच बसेल

लवकरच या मालिकेचे कथानक धक्कादायक वळण घेणार आहे.

Updated: Feb 6, 2019, 05:49 PM IST
आईशप्पथ! विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा पाहून तुम्हाला धक्काच बसेल title=

मुंबई: झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते ते रे' या लोकप्रिय मालिकेत लवकरच नवा ट्विस्ट येणार आहे. या मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि ईशा या व्यक्तिरेखांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत नुकताच विक्रांत आणि इशाचा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर मालिकेतील रंगत आणखीनच वाढली होती. मात्र, लवकरच या मालिकेचे कथानक धक्कादायक वळण घेणार आहे. 'झी मराठी'कडून नुकताच या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये एरवी शांत आणि मितभाषी असलेल्या विक्रांत सरंजामेचा वेगळा अवतार पाहायला मिळत आहे. विक्रांतचा हा अवतार पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. 

मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. आता मालिकेचा प्रोमो पाहून जालिंदरच्या दाव्यात तथ्य आहे, का अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता हे गूढ प्रेक्षकांसमोर उलगडेल. यावेळी इशासोबत लग्न का केले, यामागील खरे कारण विक्रांत सांगणार आहे. या मालिकेत सुबोध भावे विक्रांत सरंजामे आणि गायत्री दातार ईशा निमकरची भूमिका साकारत आहेत. ही मालिका टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर आहे.