नंदिता वहिनींचा 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरही दबदबा

युवा डान्सिंग क्वीनच्या मंचावर नंदिता वहिनी

Updated: Jan 13, 2020, 10:01 AM IST
नंदिता वहिनींचा 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरही दबदबा  title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून खलनायिकेची भूमिका साकारलेल्या नंदिता वहिनीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम केलं. अभिनेत्री धनश्री 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमात आपली आणखी एक कला प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे. 

असं असलं तरीही धनश्रीने साकारलेली नंदिता कुणीच विसरू शकलेलं नाही. याचा प्रत्यय झी युवाच्या 'युवा डान्सिंग क्वीन' कार्यक्रमात आलेला नाही. यावेळी सूत्रसंचलक अद्वैत दादरकरने धनश्रीने आपल्या सहस्पर्धांकबद्दल विचारलं. पण यामध्ये ट्विस्ट असा होता की, धनश्रीने तिला या स्पर्धकांबद्दल काय वाटतं? ते सांगायचंच आहे. पण त्यासोबत नंदिताला काय वाटतं हे देखील सांगायलं सांगितलं.

यावेळी धनश्रीने नंदिता वहिनींच्या खास अंदाजात आपली प्रतिक्रिया दिली. यामुळे प्रेक्षकांना खूप दिवसांनी नंदिता वहिनींचा तो खास ठसका अनुवता आला. प्रेक्षकांनी नंदिता वहिनीवर खलनायिका म्हणून भरपूर प्रेम केलं. आज मालिका सुरू असली तरीही प्रेक्षकांना नंदिता वहिनी दिसत नाही. त्यांच्यासाठी ही खास पर्वणी आहे. 
 

धनश्री सध्या झी युवावरील 'युवा डान्सिंग क्वीन' या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. तिच्या अभिनयानंतर आता नृत्याने ती सगळ्यांना घायाळ करत आहे. नुकताच तिने 'बाजीराव मस्तानी' सिनेमातील 'लटपट लटपट' या गाण्यावर नृत्य सादर केलं आहे. नंदिता वहिनीच्या कॅरेक्टरने धनश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आजही मालिका सुरू असली तरीही प्रेक्षक धनश्रीला मिस करत आहेत. तिचं अस्तित्व चाहत्यांना जाणवत राहतं.