ट्यूबलाइटचा तिसऱ्या दिवसाचा गल्ला किती जाणून घ्या

 बॉलीवूड स्टार सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट बॉक्स ऑफीसवर खूप धमाल करू शकली नाही. तीन दिवसात हा चित्रपट १०० कोटीचा गल्ला गाठण्यात अपयशी ठरला आहे. सलमानचे साधारण बहुतांशी चित्रपट तिसऱ्या दिवशी १०० कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी होतात. पण या चित्रपटाबाबत असे होऊ शकले नाही 

Rohit Gole Rohit Gole | Updated: Jun 26, 2017, 03:31 PM IST
 ट्यूबलाइटचा तिसऱ्या दिवसाचा गल्ला किती जाणून घ्या  title=

मुंबई :  बॉलीवूड स्टार सलमान खानचा चित्रपट ट्यूबलाइट बॉक्स ऑफीसवर खूप धमाल करू शकली नाही. तीन दिवसात हा चित्रपट १०० कोटीचा गल्ला गाठण्यात अपयशी ठरला आहे. सलमानचे साधारण बहुतांशी चित्रपट तिसऱ्या दिवशी १०० कोटींचा आकडा गाठण्यात यशस्वी होतात. पण या चित्रपटाबाबत असे होऊ शकले नाही 

१०० कोटीपासून अजूनही दूर हा चित्रपट...

हा चित्रपट सोमवारी ईदच्या निमित्त सर्वाधिक कमाई करून १०० कोटींची कमाई करू शकतो. पम गेल्या तीन दिवसातील आकडेवारी निराशाजनकच आहे. तसेच मंगळवारपासून या चित्रपटाची कमाई कमी होऊऊ शकते. 

तीन दिवसात ६४.७७ कोटींची कमाई 

ट्रेंड अनालिसिस्ट तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी २१.१५ कोटीचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी शनिवारी २१.१७ कोटी कमाई केली तर रविवारी २२ कोटी ४५ लाखांची कमाई केली. एकूण तीन दिवसात ६४.७७ कोटींची कमाई केली. 

पहिल्या दिवशी नाही झाली बंपर ओपनिंग 

पहिल्या दिवशी २१.१५ कोटीची ओपनिंग घेऊन बाहुबली-२ नंतर सर्वात चांगली ओपनिंग मिळवली आहे. पण चित्रपट शाहरूखच्या सईसच्या मागे आहे. सईसने पहिल्या दिवशी २६.३ कोटी रुपये कमविले होते. 

ईदनंतर गल्ला वाढेल...

आता आशा केली जात आहे की, सोमवारी ट्यूबलाइटचे कलेक्शनमध्ये वाढ दिसून येऊ शकते. त्यामुळे ईदनंतर गल्ला वाढण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सलमान आणि सोहेल खान लीड रोलमध्ये आहे. चीनी अभिनेत्री झूझ हिनेदेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू केला आहे.