लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे - शबाना आजमी

चित्रपटात एकही गाणं अथवा संवाद लिहला नसतानाही श्रेय यादीमध्ये गीतकार जावेद यांचे नाव देण्यात आले.

Updated: Mar 25, 2019, 11:52 AM IST
लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे - शबाना आजमी title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशोगाथेवर बेतलेला 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट ५ एप्रिल रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. काही दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे. बॉलिवूड मधील जेष्ठ अभिनेत्री आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी शबाना आजमी यांनी ट्विटवर एक पोस्ट केले. या पोस्टमध्ये त्या बोलल्या. 'पी एम नरेंद्र मोदी चित्रपटाच्या निर्मात्यांनी मुद्दाम चित्रपटाच्या यादीत जावेद यांना श्रेय दिले आहे. त्यांनी चित्रपटात कोणतेही काम केलेले नाही, निर्माते फक्त लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत.' 'ईश्वर अल्लाह तेरे जहां में' हे गाणं दिपा मेहता यांच्या '१९४७ अर्थ' या चित्रपटातील आहे. 

होळीच्या दिनाचे औचित्य साधत 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या श्रेय यादीमध्ये जावेद अख्तर यांचे नाव पाहून त्यांना आश्चर्य वाटले.चित्रपटात एकही गाणं अथवा संवाद लिहला नसतानाही श्रेय यादीमध्ये नाव कसे आले. ट्विट करून जावेद अख्तर यांनी ही माहिती चाहत्यांना कळवली. 

चित्रपटाचे निर्माते यांनी सुध्दा ट्विटमध्यमातून या वादाचे समर्थन केले आहे.'चूंकी टी-सीरिज आमची आधिकृत संगीत भागीदार असल्याने, '१९४७ अर्थ' चित्रपटातील 'ईश्वर अल्लाह तेरे जहां में' आणि 'दस' चित्रपटातील 'सुनो गौर से दुनिया वालों' या दोन गाण्यांचे गीतकार जावेद अख्तर आणि समीरजी असल्याने आम्ही श्रेय यादीत दोन्ही गीतकारांची नावे दिली आहेत.'