Filmfare Awards 2019 : आलिया- रणबीरने गाजवलेल्या ‘फिल्मफेअर’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी....

हे आहेत यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कारांचे मानकरी 

Updated: Mar 25, 2019, 11:24 AM IST
Filmfare Awards 2019 : आलिया- रणबीरने गाजवलेल्या ‘फिल्मफेअर’च्या विजेत्यांची संपूर्ण यादी....  title=

मुंबई : रेड कार्पेट, कलाकारांचा झगमगाट आणि पुरस्कारासाठी स्पर्धेत असणारे बॉलिवूड चित्रपट अशा एकंदर वातावरणात यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. नुकत्याच पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांची विशेष उपस्थिती पाहायला मिळाली. पण,  खऱ्या अर्थाने हा  पुरस्कार सोहळा गाजवला तो म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिचा प्रियकर, अभिनेता रणबीर कपूर याने. 

 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare) on

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून आलिया आणि रणबीरचा गौरव या पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आलं. अशा या सोहळ्यात दीपिका आणि रणवीरच्या जोडीवरही प्रेक्षकांच्या आणि संपूर्ण कलाविश्वाच्या नजरा खिळल्या होत्या. धमाकेदार परफॉर्मन्स, चित्रपटांवर होणारा पुरस्कारांचा वर्षाव अशा वातावरणात ६४ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. चला तर मग एक नजर टाकूया यंदाच्या पुरस्कार सोहळ्यातील विजेत्यांच्या यादीवर.... 

सर्वोत्कृष्ट चित्रपट- राझी 
सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती)- अंदाधुन 
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (राझी) 
सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर (संजू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)- नीना गुप्ता (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)- रणवीर सिंग (पद्मावत), आयुष्मान खुराना (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण)- सारा अली खान (केदारनाथ)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण)- इशान खट्टर (बियॉन्ड द ल्काउड्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन- मेघना गुलजार (राझी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (पदार्पण)- अमर कौशिक (स्त्री)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- गजराज राव (बधाई हो), विकी कौशल (संजू)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट संवाद- अक्षत घिलदैल (बधाई हो)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा- अनुभव सिन्हा (मुल्क)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (लघुपट)- हुसैन दलाल (शेमलेस)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (लघुपट)- किर्ती कुल्हारी (माया)
सर्वोत्कृष्ट लघुपट (प्रेक्षक पसंती)- प्लस मायनस 
सर्वोत्कृष्ट लघुपट (फिक्शन)- रोगन जोश 
सर्वोत्कृष्ट लघुपट (नॉन फिक्शन)- द सॉकर सिटी 
सर्वोत्कृष्ट संगीत- पद्मावत 
सर्वोत्कृष्ट गायक- अरिजित सिंग (ए वतन- राझी)
सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल (घूमर- पद्मावत)
सर्वोत्कृष्ट गीत- गुलजार (ए वतन- राझी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- डॅनिअल जॉर्ज (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना- कुणाल शर्मा (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- कृती महेस मिद्या, ज्योती तोमर (घूमर- पद्मावत)
सर्वोत्कृष्ट साहसदृश्ये- विक्रम दाहिया, सुनिल रॉड्रीगेज (मुक्काबाज)
सर्वोत्कृष्ट छायांकन- पंकज कुमार (तुंबाड) 
सर्वोत्कृष्ट संकलन- पूजा लधा सुरती (अंधाधुन)
सर्वोत्कृष्ट वेशभूषा- शीतल शर्मा (मंटो)
सर्वोत्कृष्ट निर्मिती- नितीन झिहानी चौधरी आणि राजेश यादव (तुंबाड)
सर्वोत्कृष्ट वीएफएक्स- रेड चिलीज एफएक्स (झिरो)