नवी दिल्ली : सोशल मीडियावर काहीही व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एखाद्या फोटो, घटनेमागची सत्यता न पडताळच अनेकजणांना पुढे फॉरवर्ड करत सुटतात. असाच एका महिला पोलीस ऑफीसरचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, पंजाबची ही एसएचओ खूप सुंदर आहे.
ही महिला पोलीस पंजाबमधील बठिंडा ठाण्याची एसएचओ असून हिचे नाव हरलीन मान आहे.
प्रत्येकाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एव्हाना हा फोटो आला असेल.
या फोटोमागची सत्यता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा व्हॉट्सअॅप वर ज्या महिलेला पंजाबची पोलीस म्हटले गेले आहे, ती एक बॉलीवूड एक्ट्रेस आहे.
हिचे नाव कायनात अरोरा असे आहे. यावेळी ती एक पंजाबी सिनेमा करत आहे.
जग्गा जेऊंदा असे या सिनेमाचे नाव आहे. तिने स्वत: या विषयाची पुष्टी केली आहे.
कायनात अरोरा आपल्या पोस्टमध्ये म्हणते, 'मी अटक व्हायला तयार आहे' असे मेसेज माझ्या मोबाईलवरही यायला लागले आहेत.
हरलीन मान असे माझे फिल्ममधील कॅरेक्टर आहे. जग्गा जेऊंदा असे फिल्मचे नाव आहे. मी कोणी पोलीस ऑफिसर नसून गेले ३ दिवस ही बातमी व्हायरल होत आहे.
कायनातनेच तिचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. ज्यानंतर लोकांना ती पोलीस ऑफिसर वाटली.
कायनातने बॉलीमध्ये अनेक मोठे सिनेमे केले आहेत.
ग्रॅंड मस्ती, खट्टा मीठा आणि अनेक तामिळ फिल्म तिने केल्या आहेत.
पंजाबी सिनेमा फरारमध्येही तिने काम केले आहे. सध्या ती जग्गा जेऊंदा सिनेमात पोलीस ऑफिसरची भूमिका करत आहे. (फोटो सौजन्य - कायनात इन्स्टाग्राम अकाऊंट)