तृप्ती भोईरच्या "माझा अगडबम"चा धमाकेदार ट्रेलर

आत्तापर्यंत अभिनेत्री-निर्माती अशी ओळख असलेली तृप्ती भोईर ही मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘माझा अगडबम’ तिच्या आगामी सिनेमाच्या माध्यमातून तृप्ती दिग्दर्शिकेच्या भूमिकेतही बघायला मिळणार आहे. याआधी आलेला ‘अगडबम’ हा सिनेमाचा चांगलाच गाजला होता. 

Updated: Sep 5, 2017, 07:06 PM IST
तृप्ती भोईरच्या "माझा अगडबम"चा धमाकेदार ट्रेलर title=

मुंबई : आत्तापर्यंत अभिनेत्री-निर्माती अशी ओळख असलेली तृप्ती भोईर ही मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झाली आहे. ‘माझा अगडबम’ तिच्या आगामी सिनेमाच्या माध्यमातून तृप्ती दिग्दर्शिकेच्या भूमिकेतही बघायला मिळणार आहे. याआधी आलेला ‘अगडबम’ हा सिनेमाचा चांगलाच गाजला होता. 

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री तृप्ती भोईर ही लग्न बंधनात अडकली. त्यानंतर तिने तिच्या ‘माझा अगडबम’ या सिनेमाची घोषणा केली होती. या सिनेमात तॄप्ती मुख्य भूमिकेत असून सुबोध भावे, उषा नाडकर्णी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वत: तृप्तीने केलं असून कथाही तिने लिहिली आहे. तर दाऊद शेख यांच्यासोबत पटकथाही तिनेच लिहिली आहे. 

तृप्ती भोईर फिल्म्सची निर्मिती असलेल्या या सिनेमाला तिचा पती संगीतकार टी सतीश चक्रवर्थी यांनी संगीत दिलंय. तर या सिनेमातील गाणी मंदार चोळकर यानी लिहिली आहेत. या सिनेमात तृप्ती डब्ल्यू डब्ल्यू ई च्या पहेलवानांसोबत कुस्ती करताना दिसणार आहे.