मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेता ब्रॅड पिट अँजेलिना यांच्या नात्यातील तणावाचे संबंध अनेकदा उघड झाले आहेत. ब्रॅड पिटपासून वेगळी झाल्यानतंर एकटेपणा नकोसा झाला आहे असे अभिनेत्री अँजेलिना जोलीने सांगितले. 'द टेलिग्राफ'ला दिलेल्या मुलाखतीत तिने एकटेपणावर भाष्य केले आहे.
ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली दोन वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. पण हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. डिसेंबरमध्ये अँजेलिनाने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
'सिडनी मॉर्निंग हेराल्ड' या वृत्तपत्राला मुलाखत देताना ती बोलत होती. तिने सांगितले की मागील वर्षात मी मुलांच्या संगोपनात अधिक वेळ घालवला होता. 'मी एकटेपणामुळे नाखूश आहे, हे खूप कठीण आहे. मला हे सगळ नको होतं,' अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.