प्रियांकाने चाहत्यांना दिली गूड न्यूज, सोशल मीडियावर दिली माहिती...

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)चाहत्यांना गूड न्यूज (Good News) दिली आहे. 

Updated: Aug 16, 2022, 03:31 PM IST
प्रियांकाने चाहत्यांना दिली गूड न्यूज, सोशल मीडियावर दिली माहिती... title=
trending news priyanka chopra got the video shot in the bathroom actress reveal something in marathi

Priyanka Chopra Video - बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra)चाहत्यांना गूड न्यूज (Good News) दिली आहे. सोशल मीडियावरही याबद्दल खूप चर्चा होते आहे. प्रियांकाने स्वत:च त्याबद्दल सांगितलं आहे. प्रियांका सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिने इंस्टाग्रामवर नवीन व्हिडीओ टाकल्या आहे. या व्हिडीओमुळे प्रियांका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा व्हिडीओ तिने बाथरुममध्ये शूट केला आहे. (trending news priyanka chopra got the video shot in the bathroom actress reveal something in marath)

या व्हिडीओमध्ये ती बाथरुममधील आरशावर एक तारीख लिहिताना दिसत आहे. आता या तारखेला प्रियांकाच्या आयुष्यात काही तरी विशेष किंवा मोठं घडणार आहे हे नक्की. या व्हिडीओमध्ये प्रियांकाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनवरून तिच्या घरी पुन्हा गूड न्यूज आहे असं वाटतं आहे. ''प्रिय आरसा, मी स्वतःला सर्व काही उघड करण्यापासून रोखू शकत नाही,'' या शब्दात प्रियांकाने आपलं गुपित उघड करत आहे.  

बाथरुममधील स्टीम मिररवर धुक्याच्या सेटिंगवर 26 ऑगस्ट 2022 ही तारीख तिने लिहिली आहे.  मातृत्वाचा आनंद लुटणाऱ्या प्रियांकाच्या चेहऱ्यावर चमक सहज या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. प्रियांका सध्या पती निक जोनाससोबत (Nick Jonas) तिच्या बाळाची काळजी घेत आहे. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. काही नेटकरी म्हणत आहेत की, ती आई होणार आहे. तर काही जण तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटनाची तारीख असल्याचं म्हणत आहेत. तर काही यूजर्स या तारखेला नक्कीच तिची वेब सीरिजच्या ट्रेलर लाँच होणार आहे असं म्हणत आहेत. 

प्रियांकाचं हे गुपित जाणून घेण्यासाठी आता चाहत्यांना 26 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)