Bigg Boss Contestant: 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होऊ शकते ही अडल्ट वेब सीरीजची अभिनेत्री, शोमध्ये दाखवणार बोल्ड तडका?

Bigg Boss 16: प्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 16' चा प्रोमो समोर आल्यानंतर आता लोक स्पर्धकांच्या नावावर आपली मते देत आहेत. दरम्यान, अशा अभिनेत्रीचे नाव देखील समोर येत आहे, जिने अडल्ट वेब सीरिजमध्ये काम केले आहे आणि आता ती बिग बॉसच्या घरात दिसू शकते.

Updated: Sep 15, 2022, 08:41 AM IST
Bigg Boss Contestant: 'बिग बॉस 16' मध्ये सहभागी होऊ शकते ही अडल्ट वेब सीरीजची अभिनेत्री, शोमध्ये दाखवणार बोल्ड तडका? title=

Bigg Boss 16 Contestant List: टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो 'बिग बॉस'चा (Bigg Boss Promo) प्रोमो नुकताच समोर आला आहे आणि प्रोमो रिलीज झाल्यानंतर आता चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. या शोशी संबंधित अपडेट्स सातत्याने समोर येत आहेत. सोशल मीडियावर स्पर्धकांच्या यादीचीही जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे. अनेक रिपोर्ट्समध्‍ये दावा केला जात आहे की 'बिग बॉस 16' च्या (Bigg Boss 16) नव्या भागात अडल्ट वेब सीरिजमध्ये काम करणारी अभिनेत्री दिसू शकते, अशी चर्चा सुरु आहे.

शोबद्दल नवी माहिती समोर

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस'चा प्रोमो व्हिडिओ रिलीज झाल्यापासून चाहत्यांच्या हृदयाचे ठोकेही वाढले आहेत. यावेळी रिलीज झालेला प्रोमो पाहिला तर यावेळी नक्कीच काहीतरी वेगळे घडणार आहे असे वाटते. या कारणामुळे चाहते शोच्या नवीन भागात कोण स्पर्धक असणार आहे, याबाबत प्रश्न विचारत आहेत आणि दरम्यान, शोच्या पहिल्या स्पर्धकाबद्दल एक माहिती समोर आली आहे.

'गंदी बात'मधील अभिनेत्री

एका रिपोर्टनुसार, वादग्रस्त आणि अडल्ट वेब सीरिजमध्ये  'गंदी बात'मधील (Gandii Baat) अभिनेत्री फ्लोरा सैनी सलमान खान याच्या शोची पहिली स्पर्धक असणार आहे. मात्र, यावेळी निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. फ्लोरा सैनी ही खूप बोल्ड अभिनेत्री आहे आणि ती अनेकदा तिच्या अदाने चहाते तिच्यावर फिदा आहेत.

Bigg Boss 16: This Gandii Baat actress to be a part of Salman Khan's reality show?

यांच्या नावांची चर्चा

Lakshmi, Dhanak, Begum Jaan आणि Stree यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या फ्लोरा सैनी व्यतिरिक्त मुनव्वर फारुकी, शुभांगी अत्रे, फहमान खान, नुसरत जहाँ आणि फैजल शेख यांच्यासह अनेक नावे समोर येत आहेत. तथापि, आतापर्यंत हे सर्व केवळ एक अनुमान आहे. या नावांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.