वय फक्त आकडा... तरुणांना देखील लाजवेल 63 व्या वर्षीय अभिनेत्याचं भन्नाट बॉडी ट्रांसफॉर्मेशन

नागार्जुन यांचा आज वाढदिवस असून तो 63 वर्षांचे झाले आहेत. नागार्जुन यांच्या फिटनेसचं रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Updated: Aug 29, 2022, 11:34 AM IST
वय फक्त आकडा... तरुणांना देखील लाजवेल 63 व्या वर्षीय अभिनेत्याचं भन्नाट बॉडी ट्रांसफॉर्मेशन title=
treading news nagarjuna birthday south actor turned 63 and Do you know Nagarjunas fitness fundent ertainment news

Nagarjuna Birthday: बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार एव्हेरग्रीन नागार्जुन आजही चिरतरुण दिसतात. नागार्जुन यांना पाहून त्यांचा वयाचा आपण अंदाज लावू शकत नाही. आम्हाला सांगा तुम्हाला काय वाटतं नागार्जुन यांचं वय किती आहे ते. तर थांबा आम्ही सांगतो नागार्जुन यांचा आज वाढदिवस असून तो 63 वर्षांचे झाले आहेत. नागार्जुन यांच्या फिटनेसचं रहस्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

100 हून अधिक तमिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेल्या नागार्जुन यांचं केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. त्यांनी मनोरंजन विश्वात एक प्रभावशाली म्हणून स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे जे अनेकांसाठी फिटनेस आयकॉन देखील आहे. ते स्वत:ला तंदुरुस्त आणि तरुण ठेवण्यासाठी तासनतास वर्कआउटमध्ये घाम गाळतात. (treading news nagarjuna birthday south actor turned 63 and Do you know Nagarjunas fitness fundent ertainment news)

नागार्जुन यांचं फिटनेस मंत्र

नागार्जुन यांचं पूर्ण नाव अक्किनेनी नागार्जुन राव असून त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1959ला चेन्नईमध्ये झाला. नागार्जुन यांनी एका मुलाखतींमध्ये आपला फिटनेस फंडाचे रहस्य सांगितले आहेत. याचं श्रेय ते योग्य खाण्याच्या सवयी आणि रोजच्या व्यायामाला देतात. नागार्जुन यांच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतचा आहार ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नागार्जुन यांचा दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता एक तासाच्या जिमने होतो. त्यानंतर पहिला नाश्ता अंड्याचा पांढरा भाग आणि ब्रेडचा असतो. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या दुसऱ्या नाश्त्यामध्ये पोंगल, डोसा आणि इडली या दक्षिण भारतीय पदार्थांचा समावेश असतो.

नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत निगार्जुन काय खातात?

मग दुपारच्या जेवणात ते भात, चपाती आणि चार प्रकारच्या भाज्या खातात. दुपारच्या जेवणापूर्वी ते फळेही खातात. संध्याकाळी 7 वाजता रात्रीच्या जेवण्यात उकडलेल्या भाज्या ग्रील्ड चिकन किंवा फिश खातात आणि रात्री 10 वाजता नागार्जुन झोपतात. नागार्जुन हेही सांगतात की त्यांना डायटिंगची मुळीच आवड नाही. पण त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या आरोग्यदायी सवयी अंगिकारल्या आहेत, त्या त्यांना फिट ठेवण्या मोठं योगदान आहे. तर बाकीचे श्रेय वर्कआउट्स आणि डाएटला ते देतात. 

'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार नागार्जुन

नागार्जुन हे लवकरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.