किती ते दुर्दैव, वडिलांनी गौरी हयात असूनही का केले अंत्यसंस्कार?

राहतं घर सोडल्यानंतर जिवंतपणीत गौरीच्या वडिलांनी केले अंत्यसंस्कार, आज ती मात्र जगतेय आनंदी आयुष्य  

Updated: Oct 7, 2022, 09:25 AM IST
किती ते दुर्दैव, वडिलांनी गौरी हयात असूनही का केले अंत्यसंस्कार? title=

Taali Series: प्रत्येक मुलीसाठी वडील आणि वडिलांसाठी (father and dauughter) मुलगी सर्वस्व असते. पण मुलीकडून एखादी चूक झाली किंवा जर मुलीने एखादी गोष्ट लपवली तर वडील लेकीला शिक्षा देतात, ओरडतात...पण याठिकाणी वडिलांनी तिचं अंत्यसंस्कार (funeral) केलं. ही गोष्ट आहे ट्रान्सजेंडर गौरी सावंतची. गौरी सावंतचं (gauri sawant) जीवनपट लवकरचं वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'ताली' (taali) सीरिजमधून गौरी यांचा संघर्ष अभिनेत्री सुष्मिता सेन मांडणार आहे. (gauri sawant story)

कोण आहेत गौरी सावंत? (gauri sawant real life sroty)
गौरा सावंत यांचा जन्म मुंबईत दादर याठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांनी गौरी यांचं नाव गणेश नंदन ठेवलं. गौरी सावंत सात वर्षांच्या असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचे पालनपोषण त्याच्या आजीने केले. गौरी सावंत यांचे वडील पोलीस अधिकारी होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गौरी सावंतला त्यांच्या लैंगिकतेची जाणीव होती, पण इच्छा असूनही त्या वडिलांना सांगण्याचे धाडस करू शकत नव्हत्या. शाळेत सुद्धा सगळी मुलं गौरी सावंत यांची चेष्टा करायचे. एवढंच नाही तर अश्लील कमेंट करायचे. (gauri sawant ngo)

गौरी सावंत हळूहळू मुलांकडे आकर्षित होत होत्या. तेव्हा त्यांना समलिंगी असणे म्हणजे काय हेच कळत नव्हते. गौरी सावंत लपून त्यांच्या आजीच्या साड्या नेसायच्या आणि मुलींसरख्या नटायच्या. (gauri sawant instagram)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाळे संपली पण कॉलेजमध्ये त्यांना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. गौरी सावंत यांच्या कुटुंबीयांनी त्यांची लैंगिकता कधीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्या घरातून निघून गेल्या. तेव्हा गौरी सावंत यांचं वय 14 किंवा 15 वर्षे होतं. गौरी सावंत म्हणजेच गणेश नंदन यांनी नंतर वेजिनोप्लास्टी केली. 

वडिलांनी केलं अंत्यसंस्कर
गौरी सावंत हयात असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केलं. मात्र आता त्या आनंदी आयुष्य जगत आहेत.  गौरी सावंत या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या अनेक वर्षांपासून ट्रान्सजेंडर्ससाठी काम करत आहेत. गौरी सावंत 'कौन बनेगा करोडपती'च्या एका एपिसोडमध्येही दिसल्या होत्या. शोमध्ये अमिताभ बच्चन यांनीही त्यांचं कौतुक केले.