बॉलिवूडला मोठा धक्का... '3 idiots' फेम अभिनेत्याचं निधन

मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी एक वाईट बातमी   

Updated: Oct 7, 2022, 08:49 AM IST
बॉलिवूडला मोठा धक्का... '3 idiots' फेम अभिनेत्याचं निधन title=

मुंबई : मनोरंजन क्षेत्रासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारे अभिनेते अरुण बाली (Arun Bali ) यांचे निधन झाले आहे. अरुण बाली यांनी वयाच्या 79 व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

रिपोर्टनुसार अरुण बाली यांचं निधन सकाळी 4:30 मिनिटांच्या सुमारास झालं आहे. बाली यांनी अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. 

अरुण बाली अनेक दिवसांपासून आजारी होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होतं.अरुण बाली हे  Myasthenia Gravis   ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली आणि आज त्यांचं निधन झालं. 

अरुण बाली यांच्या निधनाने टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. (arun bali social media)

अरुण बाली यांचं करियर (arun bali biography)
अरुण बाली यांनी 90 च्या दशकात आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 'राजू बन गया जेंटलमन', 'खलनायक', 'जब वी मेट', 'फूल और अंगारे', 'केदारनाथ' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे. 

प्रत्येक वेळी त्याने आपल्या अभिनयाने वेगळी छाप सोडली आहे. याशिवाय त्याने 'बाबुल की दुआं लेती जा', 'कुमकुम' सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.