टॉप टेन मालिका आर्टीस्ट! 'या' कलाकारांची एका एपिसोडची कमाई एकूण धक्काचं बसेल

जाणून घ्या अशा टीव्ही स्टार्सबद्दल जे एका एपिसोडसाठी भरमसाठ रक्कम घेतात.

Updated: Jul 2, 2022, 09:54 PM IST
टॉप टेन मालिका आर्टीस्ट! 'या' कलाकारांची एका एपिसोडची कमाई एकूण धक्काचं बसेल  title=

मुंबई : टीव्ही मालिकेतील असे अनेक स्टार्स आहेत जे केवळ त्यांच्या पात्रांमुळेच प्रसिद्धीच्या झोतात राहत नाहीत, तर ते त्यांच्या पगारामुळे नेहमीच चर्चेत असतात. विशेष बाब म्हणजे या स्टार्सच्या एका एपिसोडची फी इतकी जास्त आहे की, हे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो.जाणून घ्या अशा टीव्ही स्टार्सबद्दल जे एका एपिसोडसाठी भरमसाठ रक्कम घेतात.

सर्वप्रथम या यादीतील कपिल शर्माचं नाव येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्मा एका एपिसोडसाठी जवळपास 50 लाख रुपये घेतात. सध्या कपिल त्याच्या टीमसोबत परदेश दौऱ्यावर आहे. त्यामुळे त्याचा शो काही काळ बंद झाला आहे.

कपिल शर्मानंतर सुनील ग्रोव्हर दुसऱ्या क्रमांकावर येतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माच्या शोमध्ये गुत्थी आणि डॉक्टर गुलाटीची भूमिका करणारा सुनील प्रत्येक एपिसोडसाठी 10 ते 12 लाख रुपये घेतो.

'अनुपमा' या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी रुपाली गांगुली एका एपिसोडसाठी सुमारे दीड ते तीन लाख रुपये घेत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टसकडून मिळालीय. तसेच या शोपूर्वी रुपालीला 'सारा भाई वर्सेस सारा भाई' या शोमधून लोकप्रियता मिळाली आहे.  

टीव्हीच्या लोकप्रिय हिरोइन्समध्ये हिना खानच्या नावाचाही समावेश होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिना खान एका एपिसोडसाठी जवळपास 2 लाख रुपये घेते. टीव्हीवर हिना 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'बिग बॉस'मध्ये दिसली होती.

हिना खाननंतर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्समध्ये रोनित रॉयच्या नावाचाही समावेश आहे. टीव्हीशिवाय रोनित बॉलिवूडमध्येही खूप सक्रिय आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनित एका एपिसोडसाठी सुमारे 1.25 लाख रुपये घेतो.

'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत रामची भूमिका साकारणारा राम कपूर टीव्हीवरील लोकप्रिय स्टार्सपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम एका एपिसोडसाठी सुमारे 1.25 लाख रुपये घेतात. 'कर ले तू भी मोहब्बत'मध्येही तो मुख्य भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'राखी का स्वयंवर शो' देखील होस्ट केला होता.

'ये है मोहब्बतें' या मालिकेत रमण भल्लाची भूमिका साकारणारा करण पटेल हा देखील टीव्हीवरील प्रसिद्ध स्टार्सपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण एका एपिसोडसाठी जवळपास 1.25 लाख रुपये घेतो.

पार्वतीच्या वहिनीची भूमिका साकारून साक्षी तन्वर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. साक्षीने 'कहानी घर घर की' या मालिकेत ही भूमिका साकारली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार साक्षी एका एपिसोडसाठी सुमारे 1.25 लाख रुपये घेते.

साक्षी तन्वरनंतर 9व्या क्रमांकावर जेनिफर विंगेटचे नाव येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मायाची भूमिका करून चर्चेत आलेली जेनिफर एका एपिसोडसाठी जवळपास 1.5 लाख रुपये फी घेते. टीव्हीशिवाय जेनिफरने वेब सीरिजमध्येही डेब्यू केला आहे.

शेवटी, टीव्हीची ईशी माँ म्हणजेच दिव्यांका त्रिपाठी येते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने घायाळ करणारी दिव्यांका एका एपिसोडसाठी सुमारे 1 लाख रुपये फी घेते.