दयाबेनच्या बिकीनी लूकनंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा; बोल्ड फोटो पाहून चाहते हैराण

तारक मेहता का उल्टा चष्मा हा असाच एक कॉमेडी शो आहे जो जवळजवळ प्रत्येकाला आवडतो

Updated: Aug 26, 2022, 10:49 PM IST
दयाबेनच्या बिकीनी लूकनंतर चाहत्यांमध्ये एकच चर्चा; बोल्ड फोटो पाहून चाहते हैराण title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा हा असाच एक कॉमेडी शो आहे जो जवळजवळ प्रत्येकाला आवडतो आणि हा भारतातील टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारा शो आहे. तारक मेहता .. मधील सर्व पात्रांची स्वतःची फॅन फॉलोइंग आहे पण लोकांनी जेवढी जेठालालची पत्नी दयाबेनाला पसंती दिली.  तितकीच क्वचितच इतर कोणत्याही पात्राला दिली.

आता दयाबेन या शोमध्ये दिसत नाही यामागचं कारण ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री दिशा वाकाणीने आता हा शो सोडला आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की, दयाबेन जेव्हा साडी सोडून बिकिनी घालून बाहेर आली तेव्हा तिची स्टाईल कशी होती.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये  साड्यांमध्ये दिसलेली दयाबेन म्हणजेच दिशा वकानी अनेकवेळा कॅमेऱ्यासमोर बोल्ड अवतारात दिसली आहे. सोशल मीडियावर असे अनेक फोटो आहेत ज्यात दया शॉर्ट ड्रेस किंवा बिकिनी घातताना दिसली आहे.

या फोटोतील दिशा वाकाणीची स्टाइल पाहून चाहते हैराण होऊ शकतात. साडी सोडून दिशाने चमकदार बिकिनी घातली आहे आणि फोटोमध्ये तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. बिकिनीसोबतच दिशाने नेकलेस देखील घातला आहे आणि तिचे केस पोनी टेलमध्ये बांधले आहेत. या फोटोमध्ये दिशाचा क्लीवेजही दिसत आहे आणि तिने हा लूक एका डान्स व्हिडिओसाठी केला आहे.