दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. 

Updated: Aug 26, 2022, 10:02 PM IST
दाक्षिणात्त्य चित्रपटांबरोबरच आता 'हा' उद्योग पडतोय हिंदी चित्रपटसृष्टीवर भारी?  title=

OTT Vs Bollywood: ​​बॉलीवूड सध्या मोठ्या चढ-उतारांतून जात आहे. सध्या दाक्षिणात्त्य चित्रपटांमुळे हिंदी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर दणकून मार खावा लागतो आहे. त्यातून समोर आलेल्या माहितीनुसार हिंदी सिनेमांचे सिंगल स्क्रिन्सही कमी झाले आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार हेही कळते की दक्षिणेत चित्रपटांसाठी स्क्रिन्स चांगल्या मिळत आहेत पण उत्तरेत मात्र तेवढ्या स्क्रिन मिळत नसल्याचे दिसते आहे. दाक्षिणात्त्य चित्रपटांच्या वर्चस्वामुळे हिंदी चित्रपटांना आता विचार तर करावा लागणारच आहे पण त्याचबरोबर आता हा जागतिक मनोरंजन क्षेत्रात उद्योगही चित्रपटसृष्टीवर भारी पडू शकतो. 

सध्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध आशय पाहायला मिळतात. तरुण वर्ग या प्लॅटफॉर्मचा अधिक वापर करून त्यांना सर्वात जास्त आवडत असलेल्या कथा पाहतो. अजूनही OTT प्लॅटफॉर्मच्या तुलनेत चित्रपटगृहांमध्ये मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात परंतु तरूणांमध्ये मात्र या ओटीटीची क्रेझ प्रचंड प्रमाणात आहे. 

OTT मधील वाढीमुळे चित्रपटगृहांच्या प्रेक्षकसंख्येवर आणि नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे कारण 50 टक्क्यांहून अधिक लोक एका महिन्यात 5 तासांपेक्षा जास्त वेळ OTT वापरतात. तसेच स्मार्ट टीव्ही, क्रोमकास्ट सारख्या पर्यायांनी चित्रपटागृहांवर सर्वाधिक प्रभाव टाकला आहे.  

भारतात 450 दशलक्ष OTT ग्राहक आहेत? 
भारतीय मनोरंजन उद्योगातील एक मोठा उद्योग म्हणजे OTT (ओव्हर-द-टॉप) चा उदय, ज्याचा वाटा मनोरंजन उद्योगात सुमारे 7-9 टक्के आहे आणि सर्व भाषांमध्ये यावर Original contenr सतत वाढत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारतात 450 दशलक्ष OTT सदस्य आहेत आणि 2023 च्या अखेरीस ते 500 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.