Viral Video : पार्टीला येतानाच 'टल्ली' मग जाताना काय अवस्था? सलमानच्या वहिनीला पाहणारे हैराण

Viral Video: सलमान खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या न त्या कारणानं चर्चेत असतं. गेल्या काही वर्षांमध्ये एकत्र असणारं सलमानचं हे कुटुंब काही कारणास्तव विखुरलं जात आहे हेसुद्धा तितकंच खरं. 

Updated: Dec 28, 2022, 01:38 PM IST
Viral Video : पार्टीला येतानाच 'टल्ली' मग जाताना काय अवस्था? सलमानच्या वहिनीला पाहणारे हैराण  title=
Bollywood celebrity Seema Sajdeh viral drunk video sons reaction

Sohail Khan Ex Wife Seema Sajdeh: सलमान खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब या न त्या कारणानं चर्चेत असतं. गेल्या काही वर्षांमध्ये एकत्र असणारं सलमानचं हे कुटुंब काही कारणास्तव विखुरलं जात आहे हेसुद्धा तितकंच खरं. पण, या 'खान'दान ची चर्चा मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. आता एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचच उदाहरण घ्या. जिथं सलमानची वहिनी, म्हणजेच सोहेल खानची Ex Wife सीमा सजदेह पार्टी मूडमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या सीमाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असून, त्यामध्ये सीमाला पाहताना अनेकजण हैराण झाले आहेत. कारण ती इथे चक्क झिंगताना दिसत आहे. 

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सीमा (Karan johar) करण जोहरच्या घराबाहेर असल्याचं पाहायला मिळत आहे. इथं ती पार्टीसाठी आल्या क्षणापासूनच चालताना गडबडताना दिसत, एके ठिकाणी तर तिचा तोलही जाताना दिसत आहे. अॅनिमल प्रिंट असणाऱ्या आऊटफिटमध्ये यावेळी सीमनं प्रत्येकाच्याच नजरा वळवल्या. Fabulous Lives of Bollywood Wives मुळं प्रकाशझोतात आलेल्या सीमाचा हा अवतार आणि तिची चाल पाहून नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत व्यक्त झाले. 

हेसुद्धा वाचा : Actress Tragic Life : 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीनदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली? 

'ही पार्टीला येतानाच टल्ली झालीये, तर जाताना काय अवस्था असेल?', 'ही काय घर सांभाळेल, हिला स्वत:ला सांभाळता येत नाहीये...', असं म्हणत धक्का बसल्याचाच सूर व्हिडीओवरील प्रत्येक कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी आळवला.  

लेकानं हा व्हिडीओ पाहिला आणि....

सीमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो थेट तिच्या लेकापर्यंतही पोहोचला. (Malaika Arora) मलायका अरोराच्या Moving in with Malaika या कार्यक्रमात ज्यावेळी अभिनेत्रीनं सीमाला व्हिडीओबाबतचा प्रश्न विचारला तेव्हा तिनं यावर अखेर प्रतिक्रिया दिली. 

मी तुझा एक व्हिडीओ हल्लीच पाहिला, मला खात्रीये तो निर्वाणनंही (सीमाचा मुलगा) पाहिलाच असेल ना? असा प्रश्न मलायकानं केला. य प्रश्नाचं उत्तर देत सीमा म्हणाली, 'त्यानं व्हिडीओ पाहिल्यानंतर मला फोन केला. तो या व्हिडीओवर व्यक्त नाही झाला. पण, त्यानं काय कपडे घातलेलेस...? असं म्हणत मलाच प्रश्न केला.' थोडक्यात सीमाच्या लेकानं व्हिडीओवर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. सरतेशेवटी तिनं या व्हिडीओवरही प्रतिक्रिया देत मी काहीही नाकारत नाहीये असं म्हणत सर्वच चर्चांना पूर्णविराम दिला.