TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम

या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

Updated: Dec 7, 2022, 03:32 PM IST
TMKOC : शैलेश लोढानंतर आता 'या' प्रमुख अभिनेत्याचा मालिकेला रामराम title=

मुंबई :  तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतेय. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या मालिकेला उतरती कळा लागलीय. अभिनेत्यांनी सातत्याने मालिका सोडल्याने प्रेक्षकांनीही पाठ फिरवलीय. काहीच दिवसांपूर्वी शैलेश लोढा (Shailesh Lodha) उर्फ तारक मेहता यांनी हा शो सोडला होता. त्यानंतर आता या मालिकेतील प्रमुख पात्रानेही शो सोडला आहे. या अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. (tmkoc taarak mehta ka ooltah chashmah fame actor raj anadkat aka tappu left show after shailesh lodha)  

मीडिया रिपोर्टनुसार, टप्पूची (Tappu) भूमिका साकारणाऱ्या राज अनादकटने (Raj Anadkat) शो ला रामराम ठोकलाय. यामुळे टप्पूच्या अर्थात राजच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. राज मालिका सोडणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र राजने अफवा असल्याचं म्हणत या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता स्वत: राजनेच आपण या मालिकेतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलंय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

राज काय म्हणाला?

"सर्व प्रश्नांना पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. अधिकृतरित्या माझं तारक मेहता का उल्टा चश्मा या शो सोबत कॉन्ट्रेक्ट संपलंय", असं राजने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.  

"मी चांगले मित्र बनवले. खूप काही शिकलो.  या प्रवासात सोबत असलेल्यांचा आभारी आहे. माझ्या कारकिर्दीतील हे फार महत्त्वाचे वर्ष राहिले. माझा आपण सर्वांनी टप्पू म्हणून स्वीकार केलात यासाठी धन्यवाद. संपूर्ण टीमला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा", अशा शब्दात राजने सर्वांचे आभार मानले आणि टीमला शुभेच्छा दिल्या.