नुसरत जहाँने अखेर मुलासोबत जोडलं वडिलांचं नाव, बर्थ सर्टिफिकेट आलं समोर

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांविषयी सतत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

Updated: Sep 16, 2021, 11:58 AM IST
नुसरत जहाँने अखेर मुलासोबत जोडलं वडिलांचं नाव, बर्थ सर्टिफिकेट आलं समोर title=

मुंबई : टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांविषयी सतत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. पण आता कोलकाता महानगरपालिकेने जारी केलेल्या मुलाच्या प्रमाणपत्रातून बाळाच्या वडिलांचे नाव उघड झाले आहे.

होय, अभिनेत्री नुसरत जहाँच्या मुलाच्या वडिलांचे नाव देबाशिष दासगुप्ता असे लिहिले गेले आहे. जे अभिनेता यश दासगुप्ताचे अधिकृत नाव आहे, तर मुलाचे नाव ईशान जे दासगुप्ता असे प्रमाणपत्रात लिहिले आहे.

टीएमसी खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँने 26 ऑगस्ट 2021 रोजी बाळाला जन्म दिला. अभिनेत्रीची गर्भधारणा खूप वादात होती. कारण तिच्या गर्भधारणेच्या वेळी तिने पती निखिल जैनसोबतचे संबंध तोडण्याची घोषणा केली होती. नुसरत जहाँने निखिल जैनसोबत तिचे लग्न वैध नसल्याचे म्हटले होते. ती लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होती. यानंतर निखिल जैन यांनी एक निवेदनही जारी केले की ते मुलाचे वडील नाहीत.

नुसरत जहाँच्या मुलाच्या जन्माच्या वेळी अभिनेता यश दासगुप्ता नेहमी तिच्यासोबत दिसत होता. यश दासगुप्ता यांनीच नुसरत जहाँला रुग्णालयात नेले आणि त्यानेच मुलाच्या जन्माची पहिली माहिती दिली होती, पण तेव्हापासून मुलाच्या वडिलांबद्दल चर्चा सुरु होती.

याबाबत सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण आता हे निश्चित झाले आहे की नुसरत जहाँच्या मुलाचे वडील अभिनेता यश दासगुप्ता आहेत. नुसरतच्या मुलाच्या जन्म नोंदणीचा ​​तपशील सार्वजनिक डोमेनमध्ये समोर आला आहे. यामध्ये मुलाचे पूर्ण नाव ईशान जे दासगुप्ता असे लिहिले आहे.