आराराराssss ; Cotton साडीला डच्चू देत महिला खासदाराची सिझलिंग बिकीनीला पसंती

राजकीय वर्तुळात आलेला हा नवा चेहरा कमाल बोल्ड आणि फॅशनेबल असल्यामुळं कमाल गाजला. 

Updated: May 12, 2022, 01:57 PM IST
आराराराssss ; Cotton साडीला डच्चू देत महिला खासदाराची सिझलिंग बिकीनीला पसंती  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सिनेजगतात अभिनयाच्या बळावर प्रसिद्धी मिळवलेल्या अनेकांनीच पुढे राजकारणाची वाट धरली. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. यातच गेल्या काही काळापासून चर्चेत असणारं एक नाव म्हणजे... नुसरत जहाँ (Nusrat Jahan). 

अभिनेत्रीपासून खासदार होण्यापर्यंतचा जहाँ यांचा प्रवास पाहण्याजोगा होता. लोकसभेत जहाँ यांनी एंट्री केली आणि तेव्हापासूनच त्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या. राजकीय वर्तुळात आलेला हा नवा चेहरा कमाल बोल्ड आणि फॅशनेबल असल्यामुळं कमाल गाजला. 

त्यात तडका मिळाला तो म्हणजे जहाँ यांच्या वादग्रस्त वैवाहिक आयुष्याचा. खासगी जीवनातील ही वादळं पार करत आणि एका मुलाला जन्म दिल्यानंतर नुसरत जहाँ पुन्हा एकदा Action mode मध्ये आल्या आहेत. 

जहाँ यांनी नुकतंच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्या आकाशी रंगाच्या बिकीनी टॉपमध्ये दिसत आहेत. यासोबत त्यांनी पिवळ्या रंगाच्या स्कर्टचं कॉम्बिनेशन केल्याचं पाहायला मिळालं. 

वैकेशन कर रहीं इंजॉय

बिकिनी टॉप में आईं नजर

नुसरत यांचे बोल्ड फोटो शेअर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीसुद्धा त्यांनी असे बरेच फोटो शेअर केले होते. 

जहाँ यांच्या प्रत्येक फोटोवर हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि रिअॅक्शनस्स आल्याचं पाहायला मिळालं आहे. 

फैंस को भाया ये अंदाज

नुसरत जहाँ फक्त त्यांच्या बोल्ड अदांमुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळंही चर्चेत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळालं. पहिल्या लग्नात पडलेली वादाची ठिणगी आणि त्यानंतर अभिनेता यश दास गुप्ता याच्याशी असणारं त्यांचं नातं नजरा वळवून गेलं. 

लग्नाच्या आधीच जहाँ आई झाल्या होत्या. पुढे त्यांनी खुलेपणानं यशसोबत असणारं नातं स्वीकारलं आणि बाळाच्या खऱ्या वडिलांचं नाव संपूर्ण जगासमोर आलं. अशा या खासदारांना येत्या वर्षांमध्ये राजकारणात कोणती नवी संधी मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.