नुसरत जहां प्रग्नेंट, पती निखिल जैनपासून गेल्या सहा महिन्यांपासून दूर

नुसरत जहांच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे?

Updated: Jun 7, 2021, 08:27 AM IST
नुसरत जहां प्रग्नेंट, पती निखिल जैनपासून गेल्या सहा महिन्यांपासून दूर  title=

मुंबई : टीएमसीची चर्चेत असलेली खासदार नुसरत जहां लवकरच आई होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार खासदार गर्भवती असून लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. तिच्या या प्रेग्नेसींच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, नुसरत जहां सहा महिन्यांची प्रेग्नेंट आहे. एवढंच नव्हे तर नुसरत जहां यांचे पती निखिल जैन यांना याबाबत काहीच माहित नाही. निखिल यांचं म्हणणं आहे की, त्यांच लग्न मोडण्याच्या वाटेवर आहे. दोघं गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांसोबत नाहीत. हे बाळ माझं नसल्याचं देखील म्हटलं आहे. एवढंच नव्हे तर नुसरत आणि त्यांच्यात आता कोणताच संपर्क नाही. 

लोकसभा निवडणुकीत यशस्वी 

अभिनेत्री नुसरत जहांची लोकप्रियता पाहता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुक लढण्यास सांगितलं आहे. यानंतर नुसरतने देखील निवडणूक लढवली. फक्त निवडणुक लढवलीच नाही तर जिंकून खासदार पदापर्यंत पोहोचली. नुसरत तब्बल साडे तीन लाखाहून अधिक मतांनी जिंकली आहे. 

2019 मध्ये निवडणुक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार, नुसरत जहांने सांगितलं ती 12 वी पास आहे. तिच्याजवळ तीन करोड रुपयांची संपत्ती आहे. यशस्वी फिल्मी आणि राजकीय करिअर असूनही नुसरतचं नातं विवादात राहिलं. 

हिंदू पद्धतीने नुसरत जहांने केलं लग्न 

अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहांने कोलकाताच्या व्यावसायिक निखिल जैनसोबत 19 जून 2019 मध्ये तुर्कीत हिंदू पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर 21 जूननंतर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नुसरतने 25 जून रोजी खासदार म्हणून शपथ घेतली आहे.  

नुसरत जहांच्या नावावर फतवे 

नुसरत जहां कपाळावर सिंदूर, हातावर मेहंदी आणि लाल रंगाचा बांगड्यांचा चुडा घालून संसदेत पोहोचली होती. तिला बघून सगळेच हैराण झाले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. सिंदूर आणि मंगळसूत्र यामुळे काही कट्टरपंथियांनी तिच्याविरोधात फतवा काढला होता.