रिया चक्रवर्तीचा सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांवर धक्कादायक आरोप

सुशांत सिंह राजपूत ड्रग कनेक्शन प्रकरणात रिया चक्रवर्ती हिचा एनसीबीकडे कबुलीजबाब समोर आला आहे. यामध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

Updated: Jun 6, 2021, 08:14 PM IST
रिया चक्रवर्तीचा सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांवर धक्कादायक आरोप title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूत ड्रग कनेक्शन प्रकरणात रिया चक्रवर्ती हिचा एनसीबीकडे कबुलीजबाब समोर आला आहे. यामध्ये रियाने सुशांतच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

'सुशांतची प्रकृती ठीक नव्हती'

रियाने म्हटले आहे की, सुशांतची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांची प्रकृती अधिकच बिकट होत होती म्हणून शोविक चिंतेत होता. Clomnezepan आणि त्याचे साईड इफेक्टबाबत आम्ही बोलत होतो. डॉक्टर निकिता यांच्याकडून तपासल्यानंतर आम्हाला ही गोष्ट कळाली की, आपण गुगल बाबा बनू नये.'

मी हे देखील सांगू इच्छित आहे की, 08 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूतला त्याची बहीण प्रियंकाकडून एक व्हाट्सअॅप मॅसेज आला. ज्यामध्ये असा उल्लेख होता की, librium 10 mg, nexito, इत्यादि जे ड्रग्स होते. NDPS मध्ये, सुशांतने ती औषधं घ्यावी. तिने कार्डियोलॉजिस्ट डॉक्टर तरुणची एक प्रिस्क्रिप्शन देखील दिली होते. त्यांनी सुशांतला OPD पेशंट म्हणून मार्क केलं होतं. त्याला न भेटताच त्यांनी त्याला ऑनलाइन कंसल्टेशन केलं. याचा अर्थ सुशांतला रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. या औषधांना Psyclitists कंसल्टेशन शिवाय दिले जावू शकत नव्हते.

ड्रग्समुळे झाला असता सुशांतचा मृत्यू

रियाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, 'माझी विनंती आहे की, ही गोष्ट देखील नोट करावी की, या ड्रग्जमुळे त्याचा मृत्यू झाला असता. कारण त्याची बहिण मीतू, त्याच्या सोबत 8 ते 12 जून दरम्यान होती. मी मुंबई पोलिसांना देखील ही गोष्ट सांगितली आहे.'

'मला भेटण्यापूर्वीच त्याला अंमली पदार्थांचे व्यसन होते'

'मला हे सांगायचं आहे की सुशांत 18 वर्षांच्या वर होता. तो माझ्या संमतीशिवाय मरिजुआना खायचा. तो मला भेटण्यापूर्वीच त्याला याचं व्यसन होतं. तो माझ्याकडे यायचा त्याला वाटायचे त्याला मरिजुआना मिळेल किंवा तो मला ऑफर करु शकेल.'

सुशांतला ड्रग्सचे व्यसन होते हे घरातील सदस्यांना माहित होते

रियाने म्हटले आहे की, मी त्याला रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा माझ्याकडे पुरावा आहे. परंतु त्याला संमती नव्हती, म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करता आले नाही. मी हे देखील सांगू इच्छिते की सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांना हे माहित होते की त्याला मरिजुआनाचे व्यसन होते. मला हे देखील सांगायचं आहे की त्याची बहीण आणि मेहुणा सिद्धार्थ सुशांतबरोबर मारिजुआना खायचे आणि तेही ते आणत असत.

गेल्या वर्षी सुशांतचा मृत्यू

गेल्या वर्षी 14 जून रोजी सुशांतसिंह राजपूत त्याच्या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळला होता. यानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला हादरा बसला. सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस, बिहार पोलीस आणि त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली. मात्र, सुशांतने आत्महत्या केली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत्यूच्या एका वर्षानंतरही सुशांतच्या चाहत्यांसह कुटुंबीयांच्या मनात अनेक प्रश्न कायम आहेत.