मुंबई : टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताने टॉपलेस फोटोशूट करून पुन्हा एकदा चर्चेत आली. या फोटोवर अभिनेत्रीला युझर्सने ट्रोल केलं. मात्र अभिनेत्रीने न डगमगता ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. मल्टीकलर हिप्स्टरमध्ये टीना दत्ताने टॉपलेस फोटोशूट केलंय. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आहे.
फोटो शेअर करताना टीना द्त्ता लिहिते की,'जर तापमान वाढत असेन तर जरा सांभाळून. नवीन महिन्यात काही बदल केलेत तर फोटोज थोडे एडिट केलेत. नुकतेच काही फोटो एडिट केलेत. जर तुम्ही तुमच्या स्किनमध्ये कम्फर्टेबल असाल तर ठीक आहे.'
टीनाला या फोटोत एका युझरने खूप अपशब्द बोलले. त्याने अभिनेत्रीला कपड्यांच्या चॉईसकरता देखील ट्रोल केलं आहे. टीनाने त्या युझरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याना टॅग केलं आहे. त्यामध्ये ती म्हणते की, तुम्हा लोकांचं संगोपन असंच झालं आहे का? तुम्ही काही गोष्टी शिका. यावर ऍक्शन घेतली पाहिजे. कारण हे थांबणार नाही. असं वाटतं हे सगळ्या महिलांशी असंच बोलतात. (Tine Datta चं टॉपलेस फोटोशूट; सोशल मीडियावर चर्चा)
टीना दत्ताने स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर ट्रोलरने दीदी, याकरता मला माफ करा. यानंतर पुन्हा टीनाने उत्तर दिलं,'अच्छा आता अचानक मी तुझी दीदी झाली. किती मोठे लुझर आहेस तू.'
टीनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेयर केले आहेत. फोटो पाहून काहींना धक्का बसलाय तर काहींनी तिच कौतुक केलंय. या फोटोंमध्ये टीना दत्ताने फक्त मल्टीकलर बिकिनी परिधान केल्याचं दिसतंय. तर मोकळ्या पाठीवर तिचे केस विखुरलेले आहेत. या बोल्ड फोटोला टीनाने तितकच हटके कॅप्शन दिलंय. "हरकत नसेल तर तापमान वाढवू?" असं ती म्हणालीय. "मला वाटलं नवीन महिनात थोडा बदल हवा" अशा आशयाचं कॅप्शन तिने दिलंय.