मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिकंदर खेर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटर कॅन्सरग्रस्त किरण खेर यांची एक झलक दाखवली आहे. सिकेंदर खेर यांनी काही दिवसापूर्वी आपल्या आईच्या आजारपणाची माहिती दिली. त्यामध्ये किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा आहे. हा प्रकार ब्लड कॅन्सरशी संबंधीत आहे.
सिकंदर यांनी आपल्या आई-वडिलांसोबत म्हणजे अनुपम खेर आणि किरण खेरसोबत एक व्हीडिओ शेअर केला आहे. यावेळी किरण खेर काऊचवर बसल्याच्या दिसल्या. किरण खेर या खूप थकल्यासारख्या दिसत आहे. तसेच त्यांच्या हातावर एक पट्टी बांधली गेली आहे. पण त्यांनी आपल्या सगळ्या चाहत्या वर्गाचे खूप आभार मानले.
सिकंदर यांनी गुरूवारी 3 जून रोजी इंस्टाग्रामवर लाइव सुरू केलं. या दरम्यान त्यांनी सांगितली,'मी आई-वडिलांसोबत बसलो आहे. किरण खेर यांच्या पायाची झलक पाहू शकतो. सोबतच अनुपम खेर यांना 'हॅलो' म्हणायला सांगितलं.' सिकंदर येत्या काही काळात 41 वर्षांचे होणार आहे. त्यामुळे आता त्यांनी लग्न करावं असं यांना वाटत आहे. अनुपम खेर यांची देखील झलक यामध्ये पाहायला मिळणार आहे.
खासदार किरण खेर यांना गुरुवारी मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर हाडांची शस्त्रक्रिया करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन तीन तास सुरू होते. हे ऑपरेशन बोनमॅरोमधून कॅन्सरच्या पेशी काढून टाकण्यासाठी करण्यात आले होते. यावेळी किरण खेर यांचे पती आणि अभिनेते अनुपम खेरही उपस्थित होते.
६८ वर्षांच्या किरण खेर यांना कॅन्सर झाल्याची बातमी एप्रिल महिन्यात सर्वांना समजली. परंतु त्यांना हा आजार गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झाल्याचे निदान झाले होते. ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये किरण खेर त्यांच्या चंदीगड येथील घरी पडल्या तेव्हा त्यांचा हाता फ्रॅक्चर झाला होता. तेव्हा त्यांची तपासणी केली असता त्यांना मल्टीपल मायलोमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.