सलमान-कतारिनाच्या ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर रिलीज

सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या बहुचर्चीत ‘टायगर जिंदा हैं’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. आधीपासून चर्चा रंगल्याप्रमाणे या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्सची बरसात असून सलमान खान याचा लूकही आकर्षक दिसत आहे. कतरिना कैफ सुद्धा या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स करताना बघायला मिळणार आहे. 

Updated: Nov 7, 2017, 12:28 PM IST
सलमान-कतारिनाच्या ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर रिलीज title=

मुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या बहुचर्चीत ‘टायगर जिंदा हैं’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलाय. आधीपासून चर्चा रंगल्याप्रमाणे या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्सची बरसात असून सलमान खान याचा लूकही आकर्षक दिसत आहे. कतरिना कैफ सुद्धा या सिनेमात अ‍ॅक्शन सीन्स करताना बघायला मिळणार आहे. 

टायगर या सिनेमात सलमान खान एका मिशनसाठी नेमला गेला आहे. आता हे मिशन तो कसे पूर्ण करतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अली अब्बास जफर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. आदित्य चोप्रा यांनी निर्मिती केली असून संगीत विशाल आणि शेखर जोडीने दिलं आहे.