मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा 'टायगर जिंदा है' हा सिनेा शुक्रवारी प्रदर्शित झाला.
या सिनेमाची सलमान खानचे फॅन्स खूप दिवसांपासून वाट पाहत होते. हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेला आहे. तसेच या सिनेमाच्या निमित्ताने तब्बल 5 वर्षांनी सलमान खान आणि कतरिना कैफ एकत्र भेटले आहेत. टायगर जिंदा है हा सिनेमा अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला आहे.
एक था टायगर या सिनेमाची कथा जेथून संपते तिथूनच टाइगर जिंदा है या सिनेाची कथा सुरू होते. टायगरच्या भूमिकेत असलेला सलमान खान आपल्या कुटुंबासोबत एका ठिकाणी अगदी शांतते जीवन जगत असतो. मात्र जेव्हा त्याला कळतं की, आपल्या देशावर कुणीतरी करडी नजर टाकत आहे. तेव्हा टायगर शांत बसत नाही. आणि मग सुरू होता टायगर जिंदा है हा सिनेमा.
सिनेमाच्या सुरूवातीलाच दमदार म्युझिकसोबत टायटल येतं की, टायगर जिंदा है.... तेव्हा असं वाटतं की शत्रूंशी दोन हात करण्यासाठी तो डरकाणी देत आहे. या डरकाळीने थिएटरमधील प्रेक्षकांच्या अंगावर काटा उभा राहतो. यानंतर सलमान खानची धडाकेबाज एन्ट्री होते. यावेळी सलमान खान एका अनोळख्या जागी आपली पत्नी जोया आणि लहान मुलगा ज्युनिअरसोबत राहत असतो. तेव्हा बातमी येते की आतंकवादी संघटनेने आयएसआयएसने 40 नर्सना बंधक केलं आहे. ज्यामध्ये 25 भारतीय नर्स असून 15 पाकिस्तानी नर्स आहेत.
त्यांच्याजवळ वेळ कमी असते अशावेळी रॉला एकच नाव आठवतं ते म्हणजे टायगर.... ते या मिशनवर काम करण्यासाठी टायगरला अप्रोच करतात. मात्र टायगर म्हणजे सलमान खान त्यावेळी नकार देतो. टायगर सांगतो की, आता त्याने रॉ ची नोकरी सोडली आहे. आता त्याचं घर आहे कुटुंब आहे. तो शांतपणाने राहू इच्छितो. रॉची माणसं हे सगळं ऐकून निराश होऊन तिथून निघून जातात. आणि नंतर ही गोष्ट टायगरची पत्नी जोयाला समजते. तेव्हा ती त्याला मिशनवर जाण्यासाठी तयार करते.
त्यावेळी टायगर नर्सना वाचवण्यासाठी निघून जातो. तेव्हा सलमानला जोयाबद्दलची एक गोष्ट कळते आणि त्याच्या पाया खालची जमिनच निसटते.... आणि तेव्हा खऱ्या अर्थाने सिनेमाला सुरूवात होते. हा सिनेमा पॉवर पॅक्ड सिनेमा आहे. क्लायमॅक्स मोठ्या पडद्यावर बघताना मजा येते. सिनेमातल्या सगळ्या गोष्टी खास आहेत. डायरेक्टर, अॅक्शन, स्टोरी, रोमांस, म्युझिक सगळंच कमाल आहे.
परेश रावल, अंगद बेदी आणि कुमपद मिश्रा यांनी देखील चांगल काम केलं आहे. अली अब्बासने या सिनेमाचं दिग्दर्शन चांगल आहे. सिनेमात सर्वात खास गोष्ट आहे की गोष्ट सांगण्याची पद्धत. एका पाठोपाठ क्लायमॅक्स एवढा रोमांच आणतो की तुम्ही कुठेच कंटाळणार नाही. सलमानचा अभिनयाबद्दल काय बोलणार? त्याचे चाहते तर हा सिनेमा पाहतीलच पण इतरांनी देखील हा सिनेमा पाहण्यासारखा आहे.