OMG: विकासने आकाश ददलानीला केलं जबरदस्तीने KISS

बिग बॉसच्या घरात शुक्रवारी टेलिकास्ट होणारा एपिसोड खूपच धमाकेदार होणार असल्याचं दिसत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 22, 2017, 04:10 PM IST
OMG: विकासने आकाश ददलानीला केलं जबरदस्तीने KISS title=
Image: @TheKhabari2/Twitter

नवी दिल्ली : बिग बॉसच्या घरात शुक्रवारी टेलिकास्ट होणारा एपिसोड खूपच धमाकेदार होणार असल्याचं दिसत आहे. बिग बॉसच्या घरात भांडणं तर होतच असतात. मात्र, आता दोन सदस्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर असं काही झालं जे पाहून तुम्हालाही धक्काच बसेल.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

बिग बॉसमधील विकास, आकाश आणि अर्शी यांना एका कोठडीत ठेवण्यात आलं आहे. याच लहानशा रुममध्ये आकाश आणि विकास यांच्यात कडाक्याचं भांडण होतं आणि त्यानंतर विकास चक्क आकाशला किस करत असल्याचं पहायला मिळत आहे.

विकासला या रुममध्ये त्रास द्यायचा हे आकाशने आधीच ठरवलं होतं. तर, पुनीश म्हटला होता की, विकासला नाही पण, अर्शीला त्रास देण्यासाठी मी नक्कीच मदत करेल.

शुक्रवारी होणाऱ्या एपिसोडमध्ये विकासला त्रास देण्यासाठी आकाश अनेक गोष्टी बोलत असतो. इतकचं नाही तर त्याला गाढवही बोलतो. खूप काही बोलल्यानंतर विकासच्या सहनशीलतेचा अंत होतो आणि तो प्रचंड भडकतो. 

या एपिसोडमध्ये विकास गुप्ता हा आकाशला जबरदस्तीने किस करताना पहायला मिळणार आहे.

इतकचं नाही तर, दोघांमध्ये धक्काबुक्कीही होते.