मुंबई : 'बागी' सिनेमाचा सिक्वल असलेल्या 'बागी २' या सिनेमासाठी अभिनेता टायगर श्रॉफ चांगलीत तयारी करत आहे.
'बागी २' या सिनेमातील भूमिकेसाठी अभिनेता टायगर श्रॉफने आपलं तब्बल ५ किलो वजन वाढवलं आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: टायगर श्रॉफने दिली आहे.
टायगर श्रॉफने शुक्रवारी स्केचर्स प्रफरेमेंस गोरन ५ शू रेंजच्या लॉन्च दरम्यान म्हटलं की, 'बागी २' हा सिनेमा माझ्यासाठी एक आव्हान आहे. बागी सिनेमा हिट ठरल्यानंतर आता आगामी 'बागी २' या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. आम्ही सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
'बागी २' सिनेमाचं दुसरं शेड्यूल शनिवारपासून सुरु होत आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी सिनेमाचं पहिलं शेड्यूल्ड पूर्ण केलं आणि आता लवकरच दुसरं शेड्यूल्ड करणार आहोत असेही टायगर श्रॉफने सांगितले.
'बागी २' हा सिनेमा पूढच्या वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज करण्यात आलं होतं. पहिल्या पोस्टरमध्ये टायगर रायफल पकडून उभा असलेला दिसला आहे.