'या' गोष्टीमुळं टायगर घेणार हृतिक रोशनचा सूड!

Tiger Shoff want's Take Revenge on Hrithik Roshan : टायगर श्रॉफला हृतिक रोशनशी या गोष्टीवरून घ्यायचा आहे सूड. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत केलं वक्तव्य.

दिक्षा पाटील | Updated: Oct 20, 2023, 05:06 PM IST
'या' गोष्टीमुळं टायगर घेणार हृतिक रोशनचा सूड! title=
(Photo Credit : Social Media)

Tiger Shoff want's Take Revenge on Hrithik Roshan : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. हृतिकच्या भूमिका या नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. मग तो 'धूम 2' असो किंवा मग त्याचा 'सुपर 30' हा चित्रपट असो हृतिकच्या भूमिका या नेहमीच चर्चेत असतात. त्यात त्याचे अॅक्शनपट देखील आहेत. हृतिकचा वॉर हा चित्रपट त्याच्या अॅक्शनसाठी ओळखला जातो. स्पाय युनिव्हर्समध्ये हृतिकची एन्ट्री ही प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात ते दोघं एकमेकांच्या विरोधात कसे होते हे पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले होते.

दरम्यान, टायगरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हृतिक रोशनसोबत झालेल्या हानामारीचा सूड घेण्यावर वक्तव्य केलं आहे. वॉरमध्ये हृतिकनं मेजर कबीर धालीवालची भूमिका साकारली होती. कबीर हा एक रॉ च्या एका एलीट शॅडो यूनिटचे नेतृत्व करत होता. दुसरीकडे टायगरचा डबल रोल होता. कॅप्टन सौरभ पाटीलची भूमिका साकारत असताना त्याची भेट कबीरशी झाली होती आणि मग त्या दोघांमध्ये खूप मोठा असा फायटिंग सीन दाखवण्यात आला आहे. त्यातर टायगरनं इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत हृतिकशी बदला घेण्यावर वक्तव्य केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टायगरला या मुलाखतीत विचारण्यात आलं की यशराज फिल्मच्या स्पाय युनिव्हर्समधील पठाण, टायगर किंवा कबीर कोणत्या भूमिकेच्या विरोधात भूमिका साकारायला आवडेल. त्यावर बोलताना टायगर म्हणाला की 'जर मी एका खलनायकाच्या भूमिकेत परत आलो तर शक्यता आहे की मी हृतिक सरांचा सूड घेईन. पण मी त्यांचा इतका आदर करतो की अशी देखील शक्यता आहे की मी असं काही करू शकणार नाही.' 

दरम्यान, त्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर टायगरचा गणपत हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. चित्रपटात क्रिती सेनन आणि अमिताभ बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

हेही वाचा : 'त्या' व्हिडिओवरून अशोक सराफ यांना ट्रोल करणाऱ्यांना भाऊ कदम यांनी सुनावलं

दरम्यान, रिपोर्टनुसार, असे म्हटले जाते की वॉरचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी हे दोघे असू शकतात. पण अजुनही ही बातमी कन्फर्मेंड नाही. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आर्यन मुखर्जी करणार असल्याचे देखील म्हटले जाते.