दीपिका, प्रियंका आणि साराने सोशल मीडियाच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा

आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशन मीडिया फार महत्वाची भूमिका बजावतो. 

Updated: May 2, 2019, 07:34 PM IST
दीपिका, प्रियंका आणि साराने सोशल मीडियाच्या शिरपेचात रोवला मानाचा तूरा  title=

मुंबई : सोशल मीडियाची क्रेझ सामान्यांपासून सेलिब्रिटींनाही आहे. आपले मत व्यक्त करण्यासाठी सोशन मीडिया फार महत्वाची भूमिका बजावतो. अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोन आणि सारा अली खान यांना विशेष पुरस्काराने सन्मनित करण्यात आले आहे. 'इन्स्टाग्राम ऑफ द इयर २०१९' पुरस्काराने अभिनेत्रींना सन्मानित करण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त सक्रिय आणि व्यस्त अभिनेत्रींपैकी या तीन अभिनेत्री आहेत. 

सर्वात जास्त फॉलोअर्स या अभिनेत्रींचे आहेत. एकूण ३९ कोटी फॉलोअर्सचा त्यांच्या अकाउंटमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे 'इंगेज्ड अकाउंट ऑफ द ईयर' पुरस्काराने भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला सन्मानीत करण्यात आले.

दीपिका म्हणते की, 'मला लाकांसोबत जगायला, त्यांच्यासोबत हसायला आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर प्रेम करायला फार आवडते, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मला माझ्या चाहत्यांसह शेअर करायला आवडतात, त्यामूळे माझ्या दिवसाची सुरूवात मी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून करते.'    

'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून साराने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. सिम्बा चित्रपटाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. तिने स्वत:च्या अभिनय आणि विश्वासाच्या जोरावर कलाविश्वात एक स्थान निर्माण केले आहे. 'राइजिंग स्टार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.