मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर स्टाटर धडक या सिनेमाचे शूटिंग सुरु झालेय. या सिनेमाद्वारे जान्हवीसह शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरही बॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. धडक हा सिनेमा सैराट या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. धडक सिनेमाचे दिग्दर्शन शशांक खेतान करत आहेत.
७ जुलैमध्ये हा सिनेमा रिलीज होतोय. सिनेमाचा फर्स्ट लूक गेल्या महिन्यात समोर आला. दिग्दर्शक करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन या सिनेमाच्या शूटिंगचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोने सिनेमातील अनेक गुपिते उघडलीत.
या फोटोत दोघेही एकदम निराश असल्याचे दिसतायत. तसेच दोघांच्या समोर मातीमध्ये परी संग मधुक असं लिहिण्यात आलाय. या सिनेमातील दोघांच्या पात्रांची नावे असावीत. यासोबतच एक बंदूकही दिसतेय. यावरुन हा क्लायमॅक्सचा सीन असावा असे समजतेय.
Janhvi and Ishaan in #Dhadak ...shoot progressing rapidly! Directed by @ShashankKhaitan releasing 6th July ,2018! pic.twitter.com/sZqTNyp8mi
— Karan Johar (@karanjohar) December 16, 2017
धडक सिनेमाद्वारे श्रीदेवीची मुलगी जान्हवी मोठ्या पडद्यावर एंट्री करतेय. तिचा मुकाबला सैफ आणि अमृता सिंहची मुलगी साराशी असणार आहे. दरम्यान साराचा सिनेमा जान्हवीच्या सिनेमानंतर रिलीज होणार आहे.