पोलिसांच्या धाकाने अभिनेत्रीवर गाणं गाण्याची वेळ

का आली अभिनेत्रीवर अशी वेळ? 

Updated: Jan 12, 2020, 09:48 AM IST
पोलिसांच्या धाकाने अभिनेत्रीवर गाणं गाण्याची वेळ  title=

मुंबई : कलाकारांची क्रेझ ही प्रत्येकालाच असते. मग त्यातून आपली सुरक्षा करणारे पोलीस तरी कसे सुटतील. अनेकदा आपण पाहिलं आहे की, पोलिसांना देखील या कलाकारांबद्दल कुतूहल वाटत असतं, किंवा पोलीस देखील कलाकारांचे खूप मोठे चाहते असतात. अभिनेत्री सई ताम्हणकर अशाच पोलीस चाहत्यांच्या आग्रहाला बळी पडली आहे.  

बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकर ही अनेक तरुणांच्या दिलाची धडकन आहे. तिच्या अदा, बोल्ड अवतार यावर सगळेच जण फिदा असतात. तिने तिच्या अभिनयासोबत तिच्या आवाजाने देखील सगळ्यांना मदहोश केलं आहे. तिचं 'का जीव तोळा तोळा' हे गाणं अजूनही प्रेक्षकांच्या ओठांवर आहे.

 पण सगळ्यांची लाडकी सई, चक्क एका पोलिसांना घाबरलेली पाहायला मिळाली. या पोलिसाने तिला चक्क गाणे गाण्यास सांगितले. तिने सुद्धा 'शिट्टी वाजली' हे गाणे आपल्या आवाजात सगळ्यांसमोर सादर केले. या गाण्याचा व्हिडिओ झी टॉकीजने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. 

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' या सोहळ्यात अभिनेता सागर कारंडेने पोलिसांची भूमिका साकारली आहे. त्याने सईला गाणं गाण्यास सांगितलं. पोलीस वेशात असलेल्या सागरकरता गाणं गायलं.  'झी टॉकीज' ही मराठी चित्रपट वाहिनी दरवर्षी 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' हा सोहळा आयोजित करते. यंदाचे वर्ष सुद्धा याला अपवाद नव्हते. सई ताम्हणकरने गायलेले 'शिट्टी वाजली' हे गाणे सुद्धा यंदाच्या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले आहे. अभिनेता सागर कारंडे याने पोलिसाच्या भूमिकेत स्टेजवर एंट्री घेतली. एवढेच नाही, तर सागरने थेट प्रेक्षकांमध्ये जाऊन त्याने सगळ्या उपस्थित कलाकारांना पोलिसी जरब दाखवली. सईने या पोलिसाचा धाक घेतल्याचं सगळ्यांनाच पाहायला मिळालं. अर्थात, तिने सादर केलेले गाणे हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा मोठा विषय ठरला आहे. 

अशाच खूप मजेशीर घटना 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९' मध्ये सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम रविवार १२ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता झी टॉकीजवर पाहता येणार आहे.