मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान नेहमीच त्याच्या स्टाईल आणि हटके अंदाजामुळे चर्चेत असतो. त्याची एअरपोर्टवरील एन्ट्री असतो, किंवा चित्रपटाच्या शुटींग दरम्यानचे व्हिडिओ सगळं काही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतं.
त्यात सुरुवातीपासूनच सलमान खानचं वैयक्तिक आयुष्य देखील तितकच चर्चेत राहिलं आहे. त्याच्या गर्लफ्रेंड आणि अफेअर्सची चांगलीच चर्चा राहिली आहे. त्यात अद्याप एक प्रश्न सगळ्यांनाच आहे तो म्हणजे सलमान खान लग्न कधी करणार...
आता याबाबत मोठा खुलासा खुद्द सलमाननेच केला आहे. कोणत्या कारणामुळे आपण अद्याप अविवाहीत आहोत हे त्याने अखेर सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री रेखाची क्रेझ चाहत्यांमध्ये अजूनही कायम आहे. अनेक अभिनेत्यांना रेखाचे वेड होते, त्यामध्ये सलमानचे नाव देखील सामील आहे. सलमान खान अभिनेत्री रेखासाठी इतका वेडा होता की त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते.
लग्नाची इच्छाही त्याने आपल्या मित्रांना सांगितली होती. अभिनेत्री रेखाने स्वत: सलमान खानसमोर हा किस्सा सांगितला आहे. सलमानच्या शो 'बिग बॉस'मध्ये रेखा पाहुणी म्हणून पोहोचली होती, त्यादरम्यान अभिनेत्रीने हे गुपित उघड केले.
सलमान खानचे असे अनेक अफेअर्स आहेत, पण त्याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. रेखाने 'बिग बॉस'मध्ये एक किस्सा शेअर करताना सांगितले की, सलमान तिला फॉलो करतायचा, एकदा तो तिला फॉलो करत अभिनेत्रीच्या योगा क्लासला पोहोचला होता.
एवढंच नव्हे, तर रेखाला पाहण्यासाठी सलमान खानने योगा क्लास जॉईन केला. किस्सा शेअर करताना रेखाने सांगितले होते की, सलमान त्याच्या मित्रांना सांगत होता की तो रेखासोबत लग्न करेल.
रेखा जेव्हा सलमान खानबद्दलचा हा किस्सा शेअर करत होती तेव्हा अभिनेत्याने गंमतीत सांगितले की, तो रेखा यांच्यासाठी खूप वेडा आहे आणि रेखामुळे त्याने अजून कोणाशी लग्न केलेले नाही. यामुळेच तो आजपर्यंत अविवाहित आहे.
सलमान खानच्या या गोष्टी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. आज पर्यंत सलमान खानच्या चाहत्यांना वाटत होते की सलमानचे पहिले प्रेम संगीता बिजलानी होती. रेखा नेहमीच सलमान खानला एका चांगला मित्र मानते. त्याचबरोबर सलमान नेहमीच रेखाला आदर देत आला आहे.