ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात

आशा भोसले यांची नात जानाई भोसलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

Updated: Jan 16, 2023, 05:33 PM IST
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई सौंदर्याच्या बाबतीत देते बड्या अभिनेत्रींना मात

मुंबई : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना कोण ओळखत नाही. आशा ताईंनी शेकडो सुपरहिट गाणी गायली आणि आजही ताईंच्या आवाजाला तोड नाही. पण आशा भोसले यांची नात कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आज आम्ही तुमची ओळख करून देतो.

आशा भोसले यांची नात जानाई भोसलेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. जे पाहून तुम्हीही म्हणाल की आशा भोसले यांची नात हिरोईनपेक्षा कमी नाही.आजीप्रमाणे जनाई देखील गायिका आणि संगीतकार आहे. एवढंच नाही तर ती सोशल मीडियावर नेमही सक्रिय असते. जिचे इन्स्टाग्रामवर 47.9 हजार फॉलोअर्स आहेत. उत्तम आवाजासोबतच जानाई खूप सुंदर आहे.

आशा भोसले यांच्या मुलाचं नाव आनंद भोसले आणि सुनेचे नाव अनुजा भोसले आहे. ज्यांना दोन मुलं आहेत, त्यांच्या लहान मुलीचे नाव जानाई भोसले आहे. जिचा जन्म 16 जानेवारी 2002 रोजी मुंबईत झाला होता.

जनाई अनेकदा तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. लांब केस तिच्या सौंदर्यात भर घालतो. जानाई सिक्स पॅक या संगीत बँडसोबत काम करते, जो भारतातील पहिला ट्रान्सजेंडर बँड आहे. इतकंच नाही तर आशा भोसले यांची नात डान्सरदेखील  आहे. 2016 मध्ये तिने बर्मिंगहॅम, इंग्लंडमध्ये एक डान्स शो केला. ती बास्केटबॉल खेळाडूही आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सौंदर्याच्या बाबतीत जानाई मोठ्या अभिनेत्रींशी स्पर्धा करते आणि जानाईचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. भारतीय असो वा पाश्चात्य, जेनाईचे लूक अप्रतिम आहेत. जनाई भोसले यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. जनाईचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात जनाई  तिची आजी आशा भोसले यांच्यासोबत 'तू तू है वही दिल ने जिस अपना कहा' गाणं गाताना दिसत आहे.