This child artist is now a superstar : आई-वडील किंवा आपल्यासोबत नेहमी राहणेर लोक हे आपल्याला अनेकदा सांगताना दिसतात की, तू लहाण असतानाच मला माहित होतं की तू काही तरी करणार. ते एक अंदाज बांधतात की बाळ असं काही करतोय तर या क्षेत्रात त्याचं करिअर असेल. अनेकदा आपण कलाकारांविषयी देखील हेच ऐकतो. मस्करी मस्करीत कोणाची तरी मिमिक्री करणारा खरंच कधी अभिनेता किंवा अभिनेत्री होते हे आश्चर्याचं नसतं. आज आपण अशाच एका कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत. आज 69 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या या अभिनेत्यानं आजवर 100 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. याशिवाय हा अभिनेता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा कलाकार...
हा सेलिब्रिटी कोण असा प्रश्न असेल तर त्याचं नाव पार्थसारंथी आहे. पार्थसारंथी नावाच्या कोणत्याही कलाकाराला तुम्ही ओळखत नसाल. पण या अभिनेत्याला तुम्ही आज कमल हासन या नावानं ओळखतात. पार्थसामंथी यांनी मोठं झाल्यानंतर त्यांचं नाव बदललं. कमल हासन यांच्याविषयी बोलायचं झालं तर वयाच्या पाचव्या का सहाव्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर काही चित्रपट केले मग अखेर कमल हासन यांना चित्रपटसृष्टीत ब्रेक मिळाला. त्यानंतर जवळपास सात वर्षांनंतर डान्स असिस्टंट म्हणून म्हणून कमल हासन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. डान्समध्ये असिस्टंट म्हणून काम करण्यासोबतच कमल हासन यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यास करण्यास सुरुवात केली. या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांना कधीच कोणतं क्रेडिट मिळालं नाही.
कमल हासन यांनी 'शोले' या चित्रपटात एक असिस्टंट म्हणून काम केलं होतं. कमल हासन यांनी 1974 साली प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटात लीड अभिनेता म्हणून काम केलं होतं. याच चित्रपटानं त्यांना त्यांच्या करिअरमधील पहिला फिल्मफेअर मिळवून दिला.
हेही वाचा : कमल हासन यांच्याकडून Thug Life चा ॲक्शन पॅक टीझर शेअर; वाढदिवसानिमित्त चाहत्यांना रिटर्न गिफ्ट
कमल हासन लवकरच 'कल्कि 2899 AD' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि त्यांचं मानधन हे चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, अशी चर्चा होती की त्यांनी या चित्रपटासाठी 100 कोटी मानधन घेतले. तर काही लोक म्हणतात की त्यांनी 40 रुपये मानधन म्हणून मागितले होते. कमल हासन हे पहिले भारतीय कलाकार आहेत. ज्यांना एक कोटी रुपये मानधन म्हणून मिळाले होते. ही 1994 सालची गोष्ट आहे. तर 1988 ते 1998 मध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या भारतीय कलाकारांमध्ये कमल हासन होते.