मुंबई : बॉलिवूडची सूपरस्टार श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. श्रीदेवींचं एक स्वप्न अधुरंच राहिलं.
श्रीदेवींची मुलगी जान्हवी आणि खुशी यांना देखील श्रीदेवींच्या जाण्याने चांगलाच धक्का बसला आहे. जान्हवी श्रीदेवी यांच्यासोबत दुबईमध्ये नव्हती. ती तिच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. श्रीदेवी मुलगी जान्हवीच्या डेब्यू सिनेमासाठी खूप उत्सूक होती. पण तिचं हे स्वप्न अधुरंच राहिलं. जुलैमध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. करण जौहर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे.
जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरसोबत ही अशीच घटना घडली होती. 2012 मध्ये बोनी कपूरच्या पहिल्या पत्नी मोना कपूरचं निधन झालं. अर्जुन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. पण त्याआधीच त्याला हा धक्का बसला. अर्जुन कपूरचा पहिला सिनेमा इश्कजादे 11 मे 2012 मध्ये रिलीज झाला होता. 25 मार्चला मोना कपूर यांचं निधन झालं होतं.
संजय दत्तचा पहिला सिनेमा रॉकी 8 मे 1981 ला रिलीज झाला होता. पण रिलीजच्या 5 दिवस आधीच लेजेंड्री अॅक्ट्रेस नरगिस यांचं निधन झालं.