मुंबई : बॉलिवूड म्हटलं की प्रत्येक चित्रपटात १ तरी गाणं असतं जे लोकप्रिय ठरतं. ते गाणं जेवढं लोकप्रिय तेवढीच मेहनत त्या कलाकारांनी त्या गाण्यासाठी घेतलेली असते. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मोहरा’ हा चित्रपट सगळ्यांच्या लक्षात आहे. मात्र, या चित्रपटा पेक्षा पावसाची पहिली सर आली की आठवतं ते म्हणजे त्यातल सुपरहिट गाणं ‘टिप टिप बरसा पाणी’. हे चित्रपटातलं बोल्ड गाणं आहे. पण तुम्हाला माहितीये का? की रवीनाला हे गाणं शूट करायचं नव्हतं आणि हे गाणं शूट करताना ती खूप घाबरली होती. चला तर जाणून घेऊया रवीना हे गाणं शूट करताना का घाबरत होती.
या चित्रपटाचे लेखक शब्बीर बॉक्सवाला यांनी पत्रकारांशी संवाद साधताना रवीनाला हा चित्रपट कसा मिळाला हे सांगितले. जेव्हा हा चित्रपट दिव्या भारतीला ऑफर करण्यात आला, तेव्हा त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर, रवीना ही भूमिका करण्यास घाबरत होती कारण त्यात 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं होतं, जे गाणं शूट करताना ती घाबरत होती.
बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शब्बीर बॉक्सवाला यांनी सांगितले की, 'जेव्हा रवीना चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय यांना भेटली तेव्हा तिला माहित होते की 'मोहरा' हा एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि तिलाही तो करायचा होता.' शब्बीरनं सांगितले की, 'रवीना या चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी नर्व्हस होती. तिने असे गाणं शूट केले तर तिचे वडील नाराज होतील', असे तिनं दिग्दर्शकाला सांगितले होते, यावर दिग्दर्शक राजीव राय तिला म्हणाले की, 'हा चित्रपट वडिलांना दाखवू नका.' खूप विचार केल्यानंतर रवीनानं या चित्रपटासाठी होकार दिला आणि चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' आणि 'तू चीज बडी है मस्त मस्त' ही दोन्ही गाणी सुपर हिट ठरली.
शब्बीर बॉक्सवाला यांनी असेही सांगितले की, 'चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते जेव्हा मुंबईतील नॉव्हेल्टी चित्रपटगृहात लोकांना चित्रपटाच्या टोप्या वाटपासाठी आले होते तेव्हा एकच खळबळ उडाली होती. त्यांनी प्रेक्षकांच्या दिशेने सर्व टोप्या फेकल्या आणि निघून गेले. यासगळ्या गोंधळात सिनेमाच्या तिकिट घराची खिडकी तुटली.'