अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याची वाईट अवस्था; आता करतोय वॉचमनची नोकरी

 बॉलिवूडमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमवण्यासाठी येतात. काही टिकतात तर काही मात्र फ्लॉप होता. अनेक कलाकार काळानुसार एकाऐकी गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकराबद्दल सांगणार आहोत ज्याने बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत अनेक सिनेमे केले आहेत.

Updated: Nov 27, 2023, 05:46 PM IST
अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याची वाईट अवस्था; आता करतोय वॉचमनची नोकरी title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकजण आपलं नशिब आजमवण्यासाठी येतात. काही टिकतात तर काही मात्र फ्लॉप होता. अनेक कलाकार काळानुसार एकाऐकी गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकराबद्दल सांगणार आहोत ज्याने बॉलिवूडच्या खिलाडी कुमारसोबत अनेक सिनेमे केले आहेत. मात्र आता या कलाकाराची अवस्था पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या अभिनेत्याची हालत अशी झाली आहे की, केवळ पैशांसाठी वॉचमनची नोकरी करु लागला आहे. जाणून घेवूयात या अभिनेत्याबद्दल.
 
कोण आहे हा अभिनेता

या अभिनेत्याने अनेक सिनेमात काम केलं आहे. 'ब्लॅक फ्राइडे', 'गुलाल' आणि 'पटियाला हाउस' अशा अनेक सिनेमात अभिनेता दिसला आहे. या सगळ्या सिनेमात त्याने महत्वाच्या भूमिका साखारल्या आहेत. आज ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून, सावी सिधू ( Savi Sidhu) आहे.  या सिनेमात काम केल्या नंतर आता हा अभिनेता कठिण परिस्थितीत आयुष्य जगत आहेत. सध्या या अभिनेत्याकडे कोणतंच काम नाहीये. आणि म्हणूनच आयुष्य जगण्यासाठी अभिनेता वॉचमनची नोकरी करत आहे.

 मुलाखतीत अभिनेता सावी काय म्हणाले?
एका मुलाखतीत बोलताना सावी यांनी स्पष्ट बोलत आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना अभिनेता म्हणाला, त्याने हा निर्णय त्याची बिघडलेल्या तब्येतीमुळे घेतला. माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठिण काळ तो होता ज्यावेळी मी माझी पत्नीला गमावलं. माझ्या वडिलांचा मृत्यूव झाला यानंतर माझ्या आईचं आणि सासरच्या लोकांचा मृत्यू झाला मी आता एकमद एकटा आहे. माझी तब्येत ठिक झाल्यानंतर मला वाटलं की मला काम मिळेल. मात्र असं झालं नाही. मला काम मिळणं कठीण झालं होतं. यासाठीच मी माझी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वॉचमनची नोकरी करु लागलो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सावी साधूची ही कहाणी अभिनेता  राजकुमारने ट्विटरवर शेअर केली. जी खूप व्हायरल झाली. राजकुमारने ट्वीटमध्ये लिहीलं की, ''सावी सिद्धू सर मी तुमच्या कहाणीने प्रेरित आहे. तुझ्या सर्व चित्रपटांतील तुझ्या कामाचे मी नेहमीच कौतुक केलं आहे. तुमची सकारात्मकता मला आवडली. मी माझ्या सर्व कास्टिंग मित्रांना तुमच्यापर्यंत पोहोचण्यास सांगेन.''